Jump to content

ग्रह अवस्था

[]

││ श्री ││

सारावली हा ग्रंथ आचार्य कल्याण वर्मा यांनी लिहिला. ह्या ग्रंथामध्ये संपूर्ण होराशास्त्र सामावले आहे, अशी मान्यता आहे.


दीप्तः स्वसथो मुदितः शक्तो निपीडितो भीतः │
विकलः खलश्च कथितो नवप्रकारो ग्रहो हरिणा ││

स्वोच्चे भवतिच दीप्तः स्वस्थः स्वगृहे सुह्रद्धहे मुदितः │
शान्तः शुभवर्गस्थः शक्तः स्फुटकिरणजालश्च ││

विकलो रनिलुप्तकरो ग्रहाभिभूतो निपीडितश्चैवम् │
पापगणस्थश्च खलो नीचे भीतः समाख्यातः ││


ग्रह अवस्था

1.       बाल्यादि अवस्था (अंशात्मक)

अवस्था विषम राशी ग्रह सम राशी ग्रह
बाल 0° - 6° 24° - 30°
कुमार 6° - 12° 18° - 24°
युवा 12° - 18° 12° - 18°
वृद्ध 18° - 24° 6° - 12°
मृत 24° - 30° 0° - 6°

टीप – ग्रह युवा अवस्थेत आपल्या कारकत्वाची पूर्ण फळे देतो.

2.       दीप्तादि अवस्था (बृहत् पाराशरी होरा शास्त्राप्रमाणे)

क्र. अवस्था प्रकार ग्रह परिस्थिती
1. दीप्त उच्च राशीत
2. स्वस्थ स्व राशीत
3. मुदित अधिमित्र राशीत
4. शान्त मित्र राशीत
5. दीन समग्रह राशीत
6. दुःखित शत्रु राशीत
7. विकल पापग्रह बरोबर
8. खल पापग्रह राशीत
9. क्रोधी अस्तंगत

टीप – दीप्त, स्वस्थ, मुदित अवस्थेत पूर्ण फले, शांत व दीन अवस्थेत मध्यम तर दुःखित, विकल, खल, क्रोधी अवस्थेत अत्यल्प फळे मिळतात.

3.       शयनादि अवस्था

ग्रहांच्या शयनादि अवस्था बारा आहेत. खालील सूत्रावरून आपण ह्या अवस्था काढू शकतो.

{(अ * ब * क) + चं + घ + ल} / 12 = शेष (जे उरेल ती संख्या)

वरील सूत्रात –

अ = ज्या ग्रहाची अवस्था काढायची आहे त्याच्या नक्षत्रस्वामीचा क्रमांक (1 ते 27 पैकी)

ब = ग्रह संख्या (रवि-1, चंद्र-2 वार क्रमाप्रमाणे)

क = नवमांश संख्या (ग्रह राशीमधे कोणत्या नवमांशात 1 ते 9)

चं = चंद्राच्या नक्षत्राचा क्रमांक (1 ते 27)

घ = जन्मवेळ घटी पळांत

ल = लग्न राशी क्रमांक (1 ते 12)

बाराने भाग दिल्यावर शेष (बाकीप्रमाणे) खालील अवस्था जाणाव्यात

बाकी अवस्था बाकी अवस्था
1 शयन 7 सभा
2 उपवेशन 8 आगम
3 नेत्रपाणी 9 भोजन
4 प्रकाशन 10 नृत्यलिप्सा
5 गमन 11 कौतुक
6 आगमन 12/0 निद्रा

टीप – शयनावस्थेची फले जाणण्याकरिता बृहत् पाराशरी होराशास्त्र ग्रंथ बघावा.

4.       लज्जितादी 6 अवस्था (6)

अवस्था प्रकार फळे (भावस्थ फळे)
लज्जित पंचमस्थ ग्रह, राहूयुक्त

श, मं, सूर्य युक्त

पंचम, सप्तम वा दशम

दुखप्रद पुत्र, दारा, कर्म नाश

गर्वित उच्च/मूळ त्रिकोण शुभ भावस्थ फलदायक
क्षुधित शत्रूबरोबर, राशीत

वा दृष्ट/श

5, 7, 10 भाव, भाव, दुःख

पुत्र, दारा, कर्म नाश

तृषित जलराशीत, पाप दृष्ट

व शुभ अदृष्ट

अ(शुभ) भावस्थ फळे

----

मुदित मीत्र राशीत, दृष्ट,

दृक किंवा गुरूबरोबर

शुभ भावस्थ फळे

----

क्षोभित रवियुक्त आणि पाप

दृक, दृष्ट वा शत्रू

भावनाश 5, 7, 10 भाव

दुःखे पुत्र, दारा, कर्म नाशा

  1. ^ झा, डाॅ. सुरकान्त. "सारावली". www.chowkhambaseries.com. वाराणसी. Missing or empty |url= (सहाय्य)