Jump to content

ग्रँड रॅपिड्स (मिशिगन)

ग्रॅंड रॅपिड्स
Grand Rapids
अमेरिकामधील शहर


ग्रॅंड रॅपिड्स is located in मिशिगन
ग्रॅंड रॅपिड्स
ग्रॅंड रॅपिड्स
ग्रॅंड रॅपिड्सचे मिशिगनमधील स्थान
ग्रॅंड रॅपिड्स is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ग्रॅंड रॅपिड्स
ग्रॅंड रॅपिड्स
ग्रॅंड रॅपिड्सचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 42°57′41″N 85°39′21″W / 42.96139°N 85.65583°W / 42.96139; -85.65583

देशFlag of the United States अमेरिका
राज्य मिशिगन
स्थापना वर्ष इ.स. १८२६
क्षेत्रफळ ११३.३ चौ. किमी (४३.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६०० फूट (१८० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,८८,०४०
  - घनता १,६७७ /चौ. किमी (४,३४० /चौ. मैल)
  - महानगर ७,७४,३६१
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.grcity.us


ग्रँड रॅपिड्स (इंग्लिश: Grand Rapids) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिशिगन राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (डेट्रॉईटखालोखाल) आहे. मिशिगनच्या पश्चिम भागात लेक मिशिगनपासून ४० मैल पूर्वेला ग्रॅंड नदीच्या काठावर वसलेल्या ग्रँड रॅपिड्स शहराची लोकसंख्या २०१० साली १.८८ लाख इतकी होती.

फर्निचर उत्पादनाच्या बाबतीत ग्रँड रॅपिड्सचा जगातील पाच सर्वात मोठ्या शहरांमध्ये उल्लेख होतो. त्यामुळे ह्या शहराला फर्निचर सिटी असे टोपणनाव मिळाले आहे. अमेरिकेचे ३८वे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड ग्रँड रॅपिड्सचे रहिवासी होते.

बाह्य दुवे