ग्नू सार्वजनिक परवाना
ग्नू सार्वजनिक परवाना (इंग्लिश: GNU General Public License ; लघुरूप: GNU GPL, ग्नू जीपीएल किंवा फक्त GPL, जीपीएल) हा मुक्त सॉफ्टवेअरमधे सर्वाधिक वापरला जाणारा [१] परवाना आहे. या परवान्या-अंतर्गत वापरकर्ता मूळ सॉफ्टवेअरचा आणि मूळ स्रोत कोडाचा वापर/ अभ्यास/ बदल/ फेरवितरण (बदल करून अथवा न करता) करू शकतो. परंतु अशा फेरवितरणासाठीदेखील ग्नू सार्वजनिक परवाना लागू करणे बंधनकारक आहे.
या परवान्याचे मूळ लेखक रिचर्ड स्टॉलमन आहेत. ग्नू प्रकल्पासाठी याची निर्मिती करण्यात आली होती. इ.स. १९८९ पासून आजतागायत याच्या ३ आवृत्त्या प्रकाशीत करण्यात आल्या आहेत.
संदर्भ व नोंदी
- ^ "ओपन सोर्स लायसन्स डाटा" (इंग्लिश भाषेत). 2013-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)