Jump to content

गौरी सुखटणकर

गौरी सुखटणकर या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्या आशा जोगळेकर यांच्याकडे कथक शिकल्या आहेत. मुंबईतील पोदार कॉलेजातून बी.कॉम. केल्यावर त्यांनी कायद्याचा अभ्यास करू पाहिला परंतु अभिनयाखातर तो सोडला.

त्यांनी सुरुवातीला मागच्या ओळीतली नर्तकी, नाटकातील बदली भूमिका करणारी नटी, दूरचित्रवाणी मालिकांतून छोट्यामोठ्या भूमिका केल्या.

गौरी सुखटणकर यांची भूमिका असलेली नाटके

  • तत प प
  • सुंदरा मनामध्ये भरली
  • गांधी विरुद्ध सावरकर
  • हा सागरी किनारा
  • लहानपण देगा देवा
  • पांडगो इलो रे
  • ढॅण्टढॅण

चित्रपट

  • हर हर महादेव

दूरचित्रवाणी मालिका

  • भैरोबा
  • आभास हा
  • एक मैं पहचान (हिंदी)
  • जय मल्हार