Jump to content

गौतम बुद्धांचे कुटुंब

आंध्र प्रदेशमधील बेलम लेणीमधील बुद्ध

बुद्धांचा जन्म इ.स.पू. ५६३ साली लुंबिनी, भारतमधील शाक्य वर्णांच्या कुटुंबात झाला. त्यांना बालपणी सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जाई. कपिलवस्तु राज्यात त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य वंशांचे राजे होते, शेजारील कोशल राज्याची राजकुमारी त्यांची आई राणी महामाया होती. सिद्धार्थ बाळाचा जन्म झाल्यापासून सात दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या आईची छोटी बहिण, महाप्रजापती गौतमी यांनी त्यांना वाढवले.

त्यानंतर सिद्धार्थाने यशोधराशी विवाह केला आणि नंतर दोघांना एक मुलगा झाला, त्याचे नाव राहुल होते. यशोधरा आणि राहुल हे दोघेही पुढे बुद्ध शिष्य बनले.

त्यांचा चुलत भाऊ आनंद हे भिक्खू संघात सामील होऊन बुद्ध सेवक बनले.

गौतम बुद्धांचा संक्षिप्त जीवनपट

  1. पणजोबाचे नाव  : राजा जयसेन
  2. पणजीचे नाव  : राणी जयंती
  3. आजोबाचे नाव  : राजा सिंहहनू
  4. आजीचे नाव :राणी कच्चायना
  5. वडिलांचे नाव  : राजा शुद्धोधन
  6. आईचे नाव  : राणी महामाया
  7. मावशी  : महाप्रजापती गौतमी
  8. आत्या :अमिता, प्रमिता
  9. आत्या भाऊ :देवदत्त
  10. सावत्र भाऊ  : नंद, रूपनंद
  11. चुलते  : धौतोधन, शुक्लोधन, अभितोधन

अंजन

अंजन हे प्राचीन भारतातील कोलिय वंशाचे राजा होते. अंजन हे गौतम बुद्धांचे आजोबा होते. अंजनाला दोन मुले सुप्पबुद्ध व दंदापाणी, आणि दोन मुली महामाया आणि महाप्रजापती गौतमी होत्या. महामाया या बुद्धांच्या आई व महाप्रजापती गौतमी या बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. बुद्धांची पत्नी यशोधरा ह्या बुद्धांचे मामा सुप्पबुद्ध यांच्या कन्या होत्या.

शुद्धोधन

शुद्धोधन हे शाक्य वंशाचे राजे व गौतम बुद्धांचे वडील होते. शुद्धोधन राजा यांच्या विषयी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात,

"Suddhodana was a wealthy person.The Lands he held were very extensive and the retine under him was very large"

डॉ बाबासाहेब आंबेडकर

महामाया

महामाया या कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या पत्नी व गौतम बुद्धांच्या आई होत्या.

महाप्रजापती गौतमी

महाप्रजापती गौतमी या महामाया बहिण व कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या दुसऱ्या पत्नी व गौतम बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. नंतर या भिक्खूणी बनल्या.

आनंद

देवदत्त

देवदत्त हा बौद्ध भिक्खू व बुद्धांचा एक प्रमुख शिष्य होता. हा सुपब्बुध (सुप्रबुद्ध) यांचा मुलगा, गौतम बुद्धांचा चुलत भाऊ आणि आनंदांचा भाऊ होता. देवदत्त हा एक कोलीय आणि शाक्य होता. सुरुवातीला त्याच्या मनात बौद्ध धम्मा विषयी खूप आस्था हो होती मात्र कालांतराने तो बुद्ध विरोधी बनला. बुद्धांच्या भिक्खू अनुयायांपैकी निम्म्या ५०० भिक्खूंना घेऊन त्याने स्वतःचा संघ तयार केला, परंतु नंतर बुद्धशिष्य मोग्गलान याने त्यांच्या संघाचे विघटन करून टाकले. शाक्य हे देवदत्त आणि सिद्धार्थ या दोघांचे नातेवाईक होते असे म्हणले जाते.

नंद

सुंदरी नंदा

यशोधरा

राहुल

राहुल हा यशोधरा व गौतम बुद्धांचा एकमेव पुत्र होता. राहुल बुद्ध संघात सामील होऊन भिक्खू बनला.

रोहिणी

हे सुद्धा पहा

  • दहा प्रमुख शिष्य