गोहर कर्नाटकी
गोहर कर्नाटकी (इ.स. १९१०:बेळगी, कर्नाटक, भारत - १९ मे, इ.स. १९६४:मुंबई, महाराष्ट्र) या भारतीय शास्त्रीय गायिका होत्या
कौटुंबिक माहिती: गोहर कर्नाटकी यांचे वडील हुसेन खान हे अतिशय उत्कृष्ट असे तबलावादक होते. तसेच त्यांनी रंगभूमीवरील काही नाटकांसाठी तबलावादनही केले होते. हिंदी संगीत नाटकांमध्ये त्यांनी कामही केले होते. गोहरची बहीण अमीरजान हीसुद्धा गायिका होती. कार्यः गोहर कर्नाटकी या एक उत्कृष्ट गायिका होती. त्यांनी काही काळ रेडिओवर गायन आणि सिनेमांमध्ये व गंधर्व नाटक मंडळींच्या संगीत नाटकांमध्ये अभिनयही केलेला आहे. मृत्यू: गोहर कर्नाटकी यांना शेवटच्या काही वर्षांमध्ये मधुमेहासारखा दुर्धर विकार जडला होता. दिनांक १९ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे मुंबईत निधन झाले.