Jump to content

गोसावी समाज

गोसावी हा ‘गोसाई’, ‘गुसाई’, ‘गोस्वामी’ अशाही नावांनी ओळखला जाणारा वर्ग आहे.

अर्थ बोध

ही नावे ‘गोस्वामिन्’ ह्या संस्कृत शब्दापासून आली आहेत. (१)गो म्हणजे गाय(किंवा बैल) आणि (२)गो म्हणजे इंद्रिय. त्यामुळे गोस्वामिन् शब्दाचे दोन अर्थ होतात :

  • गोधनाचा मालक
  • इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे असा म्हणजे जितेंद्रिय.

समज-गैरसमज

दशनाम धारण करणारे गोसावी व त्यांचा संप्रदाय याविषयी जनतेमध्ये पुष्कळांचा गैरसमज आहे. त्यांना कित्येक गोसावी हे 'अवैदिक शैव ' आहेत असे वाटतात, तर कित्येक त्यांना 'शैव संन्यासी' समजतात. जे वैदिक संन्यासी नव्हते ते अर्थात अवैदिक संन्यासी समजतात. कित्तेकांच्या मते गोसावी हे नाथ संप्रदायी आहेत. गोसावी व त्यांच्या संप्रदायाविषयी पुष्कळशी माहिती लोकांना नाही. प्राचीन काळापासून गोसावी मंत्र, तंत्र, औषधी, चमत्कार इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत.

इतिहासकालीन संदर्भ

अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी पंजाबात गोसाव्यांचे एक लहानसे स्वतंत्र राज्यच होते. तसेच तक्षशिलेजवळ कही नग्न साधू राहत होते. मेगॅस्थिनीसनेही भारतीय संन्याशांविषयी माहिती दिली आहे. त्यांना समाजात फार मान होता, असे तो म्हणतो. नग्न जटाधारी, गृहस्थ यतींची तो माहिती देतो व ते पौरोहित्य, भविष्यकथन व औषधोपचार करतात असे म्हणतो. स्ट्रेबो हा ग्रीक इतिहासकारकही भारतातील संन्याशांचे वर्णन करतो आणि त्यांच्या जितेंद्रियत्वाचा गौरव करतो.

इ.स.३०० च्या सुमारास पंजाबात व बुंदेलखंडात परिव्राजक ब्राम्हण राजांचे राज्य असल्याचा उल्लेख आढळतो. हे राजे गोसावीच होते. बाप्पा रावळ हा गोहीलवंशीय राजाही शैव-यती होता आणि तो हरितमुनी नावाच्या गोसाव्याचा शिष्य होता. गोसावी व राजपूत यांच्यातील गुरुशिष्य संबंध आजतागायतही आढळून येतो. एकलिंगजीचे पुजारी गोसावीच आहेत. मौर्यकाळात त्यांची लहानलहान राज्ये होती. काश्मीरच्या राजाच्या पदरीही अनेक गोसावी होते असे राजतरंगिणीत म्हणले आहे. अनेक राजपूत व मराठा राजे सरदारांच्या सैन्यात गोसाव्यांचा भरणा बराच होता. औरंगजेबाने केलेल्या अन्यायांमुळे गोसावी जीवावर उदार होऊन त्यांच्याशी लढले. गोसावी शब्दाने सुरुवात होणारी अनेक नावांची नावेही भारतात आढळतात.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

हिंदुस्थानात प्राचीन काळी यज्ञयागाचे महत्त्व होते. पुढे ते मागे पडून उतर वेदकालात संन्यास जोमात आला. पुढे बुद्धाने आपला बौद्ध धर्म स्थापन केला. बौद्ध धर्मानंतर ब्राम्हणी धर्म व संस्कृत भाषा यांना महत्त्व आले. तिसऱ्या शतकात गुजरात व सौराष्ट्र येथील राजांनी त्यांचा पुरस्कार केला. गुप्त राजे बौद्ध व जैन धर्मीयांना सहिष्णुतेने वागवीत. हे सम्राट, संस्कृत भाषेचे व पंडितांचे आश्रयदाते होते व ब्राम्हणांच्या सल्ल्याने चालणारे होते. गुप्त काळात यज्ञयागाचे पुनरुज्जीवन झाले. त्यास राजा हर्ष याने पुन्हा बंदी केली. त्या काळी बहुतेक ब्राह्मणांच्या घरातून प्राचीन वैदिक कर्ममार्गाचा अवशेष म्हणून अग्निहोत्र असे. त्याच प्रमाणे उत्तर वेदकालीन मार्गाचा भाग जो संन्यासाश्रम, त्याचे देखील पुरस्कर्ते अनुयायी हर्षाच्या काळात पहावयास मिळतात. या संन्याशांपैकी फार थोडे सत्त्वशील व विद्वान असत. अशा प्रकारे सातव्या शतकाच्या अखेरीस हिंदुस्तानात अनेक राज्यांमध्ये उलथापालथी व धर्मक्रांत्या होत गेल्या.

हिंदुस्थानात बुद्धाच्या वेळी लोकांना वैदिक यज्ञयागाचा कंटाळा आला होता. म्हणून त्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्याने झाला. त्यानंतर तर्कशास्त्र व बौद्धिक विचारांचा फैलाव झाला. हा प्रकार हजार बाराशे वर्ष चालल्यानंतर तर्कशास्त्रावर आधारित धर्म ज्ञानापेक्षा पुन्हा शुद्ध प्रमाणाकडे प्रवृत्ती झाली. पूर्वमीमांसेने शुद्ध प्रमाणाचे नियम घालून दिले व आदि शंकराचार्यांनी त्या नियमांस अनुसरून वेदान्त शास्त्र तयार केले. त्यामुळे सनातन वैदिक धर्माची स्थापना झाली व लोकांची चंचल वृत्ती स्थिर होऊन ब्रह्मज्ञानाकडे लक्ष लागले. आचार्यांचा अद्वैतवाद व मायावाद यांनी राष्ट्रात विलक्षण क्रांती घडून आणली.

आचार्यांनी हे महत्त्वाचे कार्य अगदी बालवयापासून हाती घेतले. वैदिक धर्माच्या स्थापनेकरिता त्यांनी सर्व हिंदुस्थानभर प्रसार केला. मुख्य चार दिशांना चार मठ स्थापन केले. पूर्वीचा विस्कळीत गोसावी समाज नियमबद्ध केला. आपल्या शिष्यांपैकी अधिकारी विद्वानांची या पीठांवर स्थापना केली. आणि सर्वत्र अद्वैत मतांचा प्रसार केला.

हे कार्य करण्यास शंकराचार्यांना गिरी, पुरी व भारती या शिष्यांचे फार साहाय्य झाले. इतरांप्रमाणे गृहस्थ-गोसावी हे आचार्यांचे शिष्य झाले, आणि त्यांनी आचार्यांचा अद्वैत संप्रदाय उचलला.

गुरू परंपरा

शिव - विष्णू - ब्रम्हा - वसिष्ठ - शक्ती - पराशर - व्यास - शुक - गौडपाद - गोविदस्वामी - आदि शंकराचार्य

’संन्याशी पद्धत” या पोथीत आचार्यांची गुरुपरंपरा खालीलप्रमाणे दिलेली आहे -

शून्य - महा शून्य - ओमकार - नामोनम्: - नारायण - योग - युग - अविगत - शिव - विष्णू - ब्रम्हा - मार्कंडेय - लों - धौम धर्म - विमल - अत्रि - दत्तात्रय - पराशर - सरासर - भारद्वाज - गौतम - गर्ग - जनक - शुक - श्वेत - केत - दुर्वास - रोहीप्य - जाद्भारात - वामदेव - कामदेव - कपदेव - कपिल - पंचाशिख - ऋषिमुनि - देवमुनी - शिवमुनी - सेवाचार्य - षण्मुखाचार्य -