Jump to content

गोविंद तळवलकर

गोविंद तळवलकर
जन्म नाव गोविंद श्रीपाद तळवलकर
जन्म २२ जुलै, १९२५
डोंबिवली
मृत्यू २२ मार्च, २०१७
ह्युस्टन, अमेरिका
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पत्रकारिता, साहित्य, इतिहास
भाषा मराठी, इंग्रजी
साहित्य प्रकारइतिहास, लेख
कार्यकाळ १९४८-२०१७
विषय माहितीपर, आंतरराष्ट्रीय घडामोडी,
प्रसिद्ध साहित्यकृती सोवियत साम्राज्याचा उदय आणि अस्त
प्रभाव लोकमान्य टिळक, मानवेंद्रनाथ रॉय, पंडित जवाहरलाल नेहरू
वडील श्रीपाद तळवलकर
पुरस्कार रामनाथ गोयंका जीवनगौरव, लोकमान्य टिळक पुरस्कार आणि रामशास्त्री पुरस्कार

गोविंद श्रीपाद तळवलकर (जन्म : डोंबिवली, २२ जुलै, इ.स. १९२५; - ह्युस्टन (अमेरिका), २२ मार्च, इ.स. २०१७) हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक , राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार , साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे.

तळवलकर हे लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक होते, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते [].

व्यक्तिगत जीवन

गोविंद तळवलकर यांचा जन्म डोंबिवली येथे झाला.[] त्यांना दोन मुली होत्या. १९९६ मध्ये निवृत्ती घेतल्या नंतर ते अमेरिकेतील ह्युस्टन येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होते.[]

कारकीर्द

गोविंद तळवलकरांनी १९४७ साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे १९५० ते १९६२ अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. १९६२-६७ च्या दरम्यान त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६८ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे १९९६ पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्र टाइम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी व परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे.[]

टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन मॅगझिन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले.[] ते "Asian Age" साठी अमेरिकेतूनही लिहीत असत.[]

त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे. लोकमान्य टिळकांची परंपरा जपणारे आणि संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तळवलकर हे खऱ्या अर्थाने 'अग्रलेखांचे बादशहा' होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते. कवी ग.दि. माडगुळकरयांनी त्यांचा उल्लेख 'ज्ञान गुण सागर' असा केला होता.

प्रभाव

तळवलकरांवर सुरुवातीला एम. एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता.

गोविंद तळवळकरांच्या लेखनाच्या प्रभावाने किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले.[]

अग्रलेखातील लेखन

स्तंभ लेखन

आपल्या लेखनातून तळवलकरांनी वेळोवेळी महात्मा गांधींवर होणाऱ्या टीकांना मुद्देसूद उत्तरे दिली होती.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य (एकूण २५ पुस्तके)

  • अग्‍निकांड ("युद्धाच्या छायेत" ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह)
  • अग्रलेख
  • अफगाणिस्तान
  • अभिजात (१९९०)
  • अक्षय (१९९५)
  • इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याचा ताळेबंद.
  • गांधीपर्व १ व २
  • Gopal Krishna Gokhale Gandhi's Political Guru
  • ग्रंथ सांगाती (१९९२)
  • डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, २०१५)
  • नवरोजी ते नेहरू (१९६९)[२]
  • नियतीशी करार
  • नेक नामदार गोखले
  • परिक्रमा (१९८७)
  • पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह), खंड १ व २.
  • प्रासंगिक
  • बदलता युरोप (१९९१)
  • बहार
  • बाळ गंगाधर टिळक (१९७०)
  • भारत आणि जग
  • मंथन
  • यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व
  • विराट ज्ञानी - न्यायमूर्ती रानडे
  • लाल गुलाब
  • वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १, २) (१९७९,९२)
  • वैचारिक व्यासपीठे (वैचारिक, माहितीपर)
  • व्यक्ती आणि वाङ्मय (व्यक्तिचित्रणे)
  • शेक्सपियर - वेगळा अभ्यास (लेख - ललित मासिक, जानेवारी २०१६)
  • सत्तांतर (खंड १-१९७७ , २-१९८३, व ३-१९९७)
  • सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ ते ४)
  • सौरभ ( साहित्य आणि समीक्षा, खंड १, २)

पुरस्कार

  • उत्कृष्ठ पत्रकारितेचे "दुर्गा रतन" व "रामनाथ गोयंका" पुरस्कार
  • लातूर येथील दैनिक एकमत पुरस्कार []
  • न.चिं केळकर पुरस्कार ("सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त" पुस्तकासाठी)
  • इ.स. २००७चा जीवनगौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा लोकमान्य टिळक पुरस्कार
  • सामजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार

बाह्य दुवे

संदर्भ व नोंदी

  1. ^ "महाराष्ट्र टाइम्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b c d "११ सप्टे.२००९ संकेतस्थळ पान सकाळी ११ वाजता जसे दिसले". 2011-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-11 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.hindustantimes.com/india-news/veteran-editor-govind-talwalkar-passes-away/story-xP9bxfTlLDcLYCTiBpP6TN.html
  4. ^ ""एशियन एज"साठी तळवलकरांनी अमेरिकेतून लिहिलेले लेख". 2009-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-15 रोजी पाहिले.
  5. ^ ""एकमत पुरस्कार"". 2016-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-10 रोजी पाहिले.