गोविंद घोळवे
गोविंद मदनराव घोळवे यांची ’सकाळ माध्यम समूहा'त कार्यकारी संपादक (राजकीय)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ’सकाळ'च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीची जबाबदारीही त्यांच्याकडे असेल. ते १७ वर्षे पत्रकारितेत आहेत. पुढारीमध्ये त्यांनी १५ वर्षे पिंपरी-चिंचवड येथे ब्यूरो चीफ म्हणून काम पाहिले आहे. अलीकडे ते ’सकाळ'मध्ये विशेष प्रतिनिधी (राजकीय) या पदावर रुजू झाले. पदोन्नतीनंतर त्यांच्याकडे ’सकाळ समूहा'साठी राजकीय वृत्तांकनाचा समन्वय, तसेच त्यासाठी नेटवर्क उभारणीची जबाबदारी असेल.
घोळवे यांचा राजकीय क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांशी, तसेच प्रशासनातही चांगला संपर्क आहे. विविध समाजघटकांशीही त्यांचा चांगला संबंध आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील अनेक घोटाळे त्यांनी उजेडात आणले होते. भ्रष्टाचाराला वाचा फोडणाऱ्या त्यांच्या वृत्तमालिका गाजल्या होत्या. प्राधिकरणातील गैरव्यवहारांविषयी अरुण भाटिया यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती, तसेच उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती.
घोळवे हे अहमदनगर येथील श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टचे सचिव आहेत. ते मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारवाडीचे (ता. कळंब) आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेतील पदवी प्राप्त केली आहे.
गोविंद घोळवे यांना सलाम पुणे या संस्थेचा २०१२ सालचा पत्रकारितेचा सलाम पुरस्कार मिळाला आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "गोविंद घोळवे "सकाळ'चे कार्यकारी संपादक (राजकीय)". १३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]