गोवारी आदिवासी
गोवारी आदिवासी हा समाज मुख्यत्वेकरून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भात आढळून येतो.या समाजातील लोकांचे मुख्य काम गायी राखणे हे आहे.ते गायींना दररोज चरावयास घेउन जातात.गोवर्धन पूजनाचे दिवशी ते 'गायगोधनाचा' सण साजरा करतात.त्यांना (गुरे राखतो तो)गुराखी देखील म्हणतात.विदर्भातील जवळपास साडेचारहजार गावात हा सण साजरा होतो.गोवारी पुरुष या दिवशी गोहळा-गोहळी नृत्य करतात.तसेच ते 'ढालपूजनही' करतात.येथे ढाल म्हणजे एका बासावर नवीन फडकी गुंडाळणे.यात गोहळा म्हणजे पुरुष व गोहळी म्हणजे स्त्रीरूप घेतलेला इसम.डफ,बासरी ढोल वाजवत संपूर्ण गावातून चांगल्या तऱ्हेने सजविलेल्या गायींची/जनावरांची मिरवणूक काढण्यात येते.यात विविध गाणेही म्हणण्यात येतात.नंतर ही ढालीची मिरवणूक गावातील सुताराचे घरी जाते.तेथे ढालीला पाणी पाजण्यात येते.नंतर विसर्जन होते.[१]