Jump to content

गोर्हे

  ?गोर्हे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ.४६५ चौ. किमी
जवळचे शहरवाडा
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,३०३ (२०११)
• ४,९५३/किमी
भाषामराठी
सरपंचराम गणेशकर
बोलीभाषावारली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४२१३०३
• +०२५२६
• एमएच/४८ /०४ /०५

गोर्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे गोर्हे मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे.कोहोज या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी हे गाव वसलेले आहे.[]

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५१२ कुटुंबे राहतात. एकूण २३०३ लोकसंख्येपैकी ११४८ पुरुष तर ११५५ महिला आहेत. गावाची साक्षरता ७२.१० टक्के आहे.पुरुष साक्षरता ८०.८७ आहे तर स्त्री साक्षरता ६३.४८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३१० आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १३.४६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.येथील साईनाथ पारधी ह्या आदिवासी मुलाने अम्मान (जॉर्डन) येथे १७ वर्षाखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्य पदक मिळवले.[]

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

भोपिवळी, वैतरणानगर, पिंपळास, खारिवळीतर्फेकोहोज, आपटी, सांगे, आवंढे, वासुरीबुद्रुक, बोरांदे, आंबिस्तेखुर्द, आंबिस्तेबुद्रुक ही जवळपासची गावे आहेत.गोर्हे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.

संदर्भ

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट २०२४
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट २०२४