गोरेगाव विधानसभा मतदारसंघ
गोरेगाव विधानसभा मतदारसंघ - १६३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गोरेगाव मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १४५८, १४६० आणि १४६३ यांचा समावेश होतो. गोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे विद्या जयप्रकाश ठाकूर हे गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | विद्या जयप्रकाश ठाकूर | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | विद्या जयप्रकाश ठाकूर | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | सुभाष राजाराम देसाई | शिवसेना |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
गोरेगाव | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सुभाष देसाई | शिवसेना | ६९११७ |
शरद राव | राष्ट्रवादी काँग्रेस | ४४३०२ |
उदय सी. माशेलकर | मनसे | २५९८२ |
आव्हेलिने सेलिस्टीन डि'सूझा | बसपा | २२८५ |
झफर नसीम शेख | अपक्ष | ९५८ |
बाबर ललित पारसू | जद (Secular) | ७१८ |
राजेश मुन्नालाल गुप्ता | अपक्ष | ६७१ |
जयंत आर. झवेरी | अपक्ष | ६१७ |
शशीधरन के. नायर | ऑल इंडिया क्रांतिकारी काँग्रेस | ५८१ |
दीपक भाऊसाहेब घामरे | भाबम | ४५४ |
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".