गोरा (कादंबरी)
Bengali novel written by Rabindranath Tagore | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | साहित्यिक कार्य | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
लेखक | |||
वापरलेली भाषा | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
गोरा ही रवींद्रनाथ ठाकूर यांनी लिहीलेली व १९१० साली प्रकाशित झालेली एक बंगाली भाषेतील कादंबरी आहे.[१]
कथावस्तू
गोरा हा या कादंबरीचा नायक आहे.याचे मूळ नाव गौरमोहन असे आहे. गौरमोहन हा एका आयरिश दांपत्याचा मुलगा आहे. एका बंगाली कुटुंबाच्या आश्रयाने युद्धकाळात त्याची आई त्याला जन्म देते आणि मृत्यू पावते. त्यानंतर कृष्णदयाळ आणि आनंदमयी हे बंगाली दांपत्यच त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करतं. विनय हा त्याचा कट्टर आणि जिव्हाळ्याचा मित्र आहे. जवळच राहणाऱ्या परेशबाबू आणि वरदासुंदरी यांच्या ब्राह्म कुटुंबाशी विनय आणि गोराचा परिचय होतो. या परिवारातील ललिता,सुचरिता या युवती विनय आणि गोराच्या वैचारिक अधिष्ठानावर आकृष्ट होतात.ही सर्व कथावस्तू रंजक पद्धतीने रवींद्रनाथांनी पुढे नेली आहे. हरिमोहिनी,पानूबाबू ,शशिमुखी ही पात्रे कथावस्तूमधे येतात ती कथेची आवश्यकता म्हणून. मूळ कथा मात्र गोरा आणि विनय यांच्याभोवतीच घडते.
कादंबरीचे विशेष
- गोराचा स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा प्रयत्न, त्याला झालेल्या शिक्षा, विनयवर असलेला गोराचा प्रभाव अशा गोष्टी कथावस्तूचा महत्त्वाचा भाग आहेत.
- तत्कालीन बंगाली समाजात प्रचलित हिंदू आणि ब्राह्म समाजाच्या विचारधारांच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी आधारित आहे.
- या कादंबरीत रवींद्रनाथांनी धर्म आणि जातीची बंधने तोडत नवविकसनशील समाजाचा मार्ग खुला केला आहे. ब्रिटिश इंडियामधील त्याकाळात भारतीयांना सहन करायला लागणारी इंग्रजांची गुलामगिरी आणि त्यांचे अत्याचार यावरही ही कादंबरी भाष्य करते.
- मानवी मनाचा विकास करण्यासाठी आवश्यक विचार या कादंबरीत आहेत.
मराठी अनुवाद
उज्वला केळकर यांनी या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद केलेला आहे.
या बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद कै. मा. ग. बुद्धिसागर यांनी १९५९ मध्ये केला होता. तसेच त्याचा संक्षिप्त अनुवाद सुनिला बुद्धिसागर यांनी केला आहे व तो अनुवाद ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रकाशित झाला आहे.
अन्य माध्यमांवर
गोरा या कादंबरीवर आधारित बंगाली चित्रपट प्रदर्शित झाला असून दूरदर्शनवर या कादंबरीवर आधारित मालिकाही प्रसारित झालेली आहे.
संदर्भ
- ^ टागोर (मूळ लेखक), केळकर (अनुवादक), रवींद्रनाथ (मूळ लेखक), उज्वला (अनुवादक) (२०१६). गोरा. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन.