Jump to content

गोरख थोरात

डाॅ. गोरख थोरात (जन्म : संगमनेर, १ जून १९६९) हे मराठी पुस्तकांचे हिंदीत आणि हिंदी पुस्तकांचे मराठीत अनुवाद करतात. ते पुणे विद्यापीठाचे एम.ए. पीएच.डी. असून पुण्याच्या सर परशुरामभाऊ काॅलेजात हिंदीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी अनुवादित पुस्तकांखेरीज अनेक शैक्षणिक, समीक्षात्मक आणि वैचारिक पुस्तके लिहिली आहेत.

गोरख थोरात यांची पुस्तके

  • अनुवाद तंत्र आणि आव्हाने (संपादित)
  • ऐसा सहारा और कहाँ (हिंदी)
  • चित्र मुद्गल के कथा साहित्य का अनुशीलन (हिंदी)
  • बालगंधर्व- आधुनिक मराठी रंगमंच के एक मिथक की तलाश (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ अभिराम भडकमकरलिखित 'असा बालगंधर्व' ही कादंबरी)
  • देखणी (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ भालचंद्र नेमाडे यांचा देखणी हा कविता संग्रह). : या अनुवादाला अमर उजाला या संस्थेचा २०१८ सालचा शब्द सन्मान मिळाला आहे.
  • प्रयोगमूलक हिंदी (हिंदी)
  • हिन्दू : जीने का समृद्ध कबाड़ (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ भालचंद्र नेमाडे यांची मराठी 'हिंदू : एक समृद्ध अडगळ' ही कादंबरी)

गोरख थोरात यांना मिळालेले पुरस्कार

  • एन.टी. रामाराव लिटररी ॲवाॅर्ड
  • बसवराज कट्टिमणी नॅशनल ॲवाॅर्ड
  • भालचंद्र नेमाडेलिखित 'देखणी' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाला अमर उजाला या संस्थेचा २०१८ सालचा शब्द सन्मान
  • भालचंद्र नेमाडेलिखित 'देखणी' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादालाकुसुमाग्रज जनस्थान पुरस्कार
  • भालचंद्र नेमाडेलिखित 'टीका स्वयंवर' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार
  • भालचंद्र नेमाडेलिखित 'झूल' या कादंबरीच्या हिंदी अनुवादाला यशवंतराव चव्हाण पुरस्कार
  • भालचंद्र नेमाडेलिखित 'बिढार' या कादंबरीच्या हिंदी अनुवादाला ह.ना. आपटे पुरस्कार
  • भालचंद्र नेमाडेलिखित 'साहित्याची भाषा' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाला नरहर कुरुंदकर पुरस्कार
  • महात्मा फुले समता पुरस्कार
  • (समग्र साहित्य सेवेसाठी) महाराष्ट्र फाऊंडेनचा पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीकडून वर्ष २०१६चा मामा वरेरकर श्रेष्ठ अनुवादक पुरस्कार