Jump to content

गोमूत्र


गाईचे मुत्र म्हणजे गोमूत्र. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला गोमाता म्हंटले जाते. भारतीय म्हणजे देशी गाईचे मूत्र (गोमूत्र) हे एक औषधी द्रव्य आहे, असे आयुर्वेद सांगतो.[] गोमूत्राचा आयुर्वेदात औषधी उपयोग केला जातो.

गाईच्या गोमूत्राचे महत्व

  1. दातांच्या रोगात दात स्वच्छ करून गोमूत्र थोडावेळ तोंडात धरून ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या काबोलीक ऑसिडमुळे होते.
  2. लहान मुलांची हाडे कमजोर, सकाळी अनोशापोटी, नियमित ५० मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
  3. गोमूत्रामधील लॅकटोज मुले व वृद्ध याब प्रोटिन्स देते.
  4. गोमूत्र आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
  5. गोमूत्र वृद्धावस्थेमध्ये मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
  6. गोमूत्र महिलांच्या हिस्टीरिया जनिक मानसिक रोगांना रोखते.
  7. महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बारा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही. हे गोमुत्राचे वैशिष्ठ आहे.
  8. नियमित गोमूत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ कळों अतिरिक्त वजन कमी होते.
  9. गोमूत्र त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
  10. गोमुत्र थायरॉड मध्ये देखील फायदा देते.
  11. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
  12. हार्ट मधील ब्लॉकेज गोमुत्राने हळू-हळू ओपन होतात.
  13. बेकारीचे पदार्थ, वडापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थानी गॅसेस, आंबट ढेकर, ऍसिडीटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात, यावर गोमूत्र रामबाण उपाय आहे.
  14. अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
  15. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
  16. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
  17. चमचाभर गोमूत्रामध्ये २ थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
  18. गोमूत्रात थोडे गाईचे तूप व कापूर मिसळून कापड ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
  19. गुडघे, कोपर, पोटऱ्या, मासपेशींमध्ये दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
  20. शौचाला साफ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते. गोमूत्र हे लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा ५०-५० मिली घ्यावे.
  21. डायबिटीसमध्ये गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवते.

गोमूत्र सेवन करण्यापूर्वी ते दोषयुक्त नाही याची खात्री नक्की करावी म्हणजे गोमूत्र स्वच्छ काचेच्या पेल्यात घेतल्यास त्यात तंतू किंवा कण नसावेत, लालसर छटा नसावी किंवा गढूळपणा नसावा. उलट गोमूत्र पारदर्शक असावे. गोमूत्राला एक प्रकारचा तीव्र किंवा तीक्ष्ण गंध येणे स्वाभाविक असतो. पण त्याला दुर्गंध येत नाही याकडे लक्ष ठेवावे. गोमूत्र गोळा करताना स्वच्छ भांडे वापरलेले आहे याचीही आवर्जून खात्री करून घ्यावी. तसेच सेवन करायचे गोमूत्र रोजच्या रोज गोळा केलेले म्हणजे ताजेच असावे. आदल्या दिवशीचे गोमूत्र दुसऱ्या दिवशी वापरणे टाळावे. गोमूत्र खराब होत नाही पण त्याचा गंध तीव्र होतो.

आयुर्वेदात गोमूत्राचा संदर्भ

सुश्रुत संहिता, चरक संहिता, अमृतसागर, भावप्रकाश, अष्टांग संग्रह, आदी जुन्या ग्रंथांमधूनही गोमूत्र आणि पंचगव्याची माहिती व त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत. []

गोमूत्रं कटू तीक्ष्णोष्णं सक्षारत्वान्नवातलम् ।  
लघ्वग्निदीपनं मेध्यं पित्तलं कफवातजित् ।। 
शूलगुल्मोदरानाहधिरेकास्थापनादिषु । 
मूत्रप्रयोगसाध्येषु गव्यं मूत्रं प्रयोजयेत ।।

अर्थात

गोमूत्र हे कडू, उष्ण, खारट, तिखट, तुरट, लघु, अग्निदीपक, आणि वात व कफनाशक आहे.

व्यवसायिक उपयोग

अमेरिकेने आतापर्यंत गोमूत्राचे औषधी उपयोगासाठीचे सहा पेटंटे घेतली आहेत.[][]

संदर्भ

  1. ^ आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गेले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही . गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण गोमूत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र गोमूत्र याची माहिती आज आपण घेणार आहोत. गोमूत्रात पोट्याशियम, कॅल्शियम मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोट्याशियम, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, काबोलीक ऑसिडस, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्य असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धी व पोषण करतात. गौ-मुत्र--एक अद्धभुत आयुर्वेदिक उपचार [१]
  2. ^ पंचगव्य [२]
  3. ^ अमेरिकन पेटंट [३]
  4. ^ दुग्ध व्यवसायातून गटाने मिळविली बाजारपेठ [४]

बाह्य दुवे

गोमूत्र से बनी दवा को मिला अमेरिकी पेटेंट Archived 2016-03-06 at the Wayback Machine. (बिझनेस स्टैण्डर्ड)

फिनाइल की जगह करें ‘गौनाइल’ का इस्तेमाल: मेनका गांधी Archived 2015-04-02 at the Wayback Machine. (प्रभासाक्षी)

गोमूत्र खरीदेंगे बाबा रामदेव