Jump to content

गोमंतक मराठी साहित्य संमेलन

गोमंतक मराठी साहित्य परिषद ही संस्था दरवर्षी ’अखिल भारतीय गोमंतक साहित्य संमेलन’ भरवते. २०१२ आणि २०१३ साली, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गवस हे आहेत, तर सचिव, अशोक धाडी आहेत.

१ले गोमंतक मराठी साहित्य संमेलन १२,१३ फेब्रुवारी २०११ असे दोन दिवस गोव्यातील वाळपई येथील पंडित महादेवशास्त्री नगर, चर्च मैदान येथे झाले.. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार गुरुनाथ नाईक होते.

२रे गोमंतक मराठी साहित्य संमेलन गोव्यातील उसगाव-तिस्क नजीकच्या पळिये धारबांदोडाे गावातील विश्वेश्वर शंकर लाड उच्च माध्यमिक विद्यालय, आणि गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्याने पिळये येथे १५-१६ डिसेंबर २०१२ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत होते

३रे गोमंतक साहित्य संमेलन गोव्यामध्ये साखळी डिचोली येथे १४-१५ डिसेंबर २०१३ला झाले. संमेलनाच्या आयोजनात गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाचा सहभाग होता. संमेलनाध्यक्ष बाबा भांड होते.

गोवा मराठी अकादमीतर्फे डिसेंबर २०१६मध्ये एक साहित्य महासंमेलन होणार आहे.


पहा : साहित्य संमेलने