Jump to content

गोबी वाळवंट

गोबी वाळवंटाचे नकाशावरील स्थान

गोबी वाळवंट हे आशिया खंडातील सर्वांत मोठे व जगातील पाचव्या क्रमांकाचे वाळवंट आहे. हे वाळवंट चीनच्या उत्तर व वायव्य भागात व मंगोलियाच्या दक्षिण भागात सुमारे १२.९५ लाख चौरस किमी इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर पसरले आहे. येथील हवा अतिशय कोरडी असून प्रतिकुलतेमुळे प्रदेश साधारणतः निर्जन आढळतो. हिंदी महासागराकडून येणारे पावसाचे ढग हिमालय पर्वतामुळे अडले जातात ज्यामुळे गोबी वाळवंटात पाऊस पडत नाही.

मंगोल साम्राज्याचा भाग असलेल्या व रेशीम मार्गावरील अनेक शहरे असलेल्या गोबी वाळवंटाला आशियाच्या इतिहासात स्थान आहे.