Jump to content

गोपाळ बाबा वलंगकर

गोपाळ बाबा वलंगकर हे रत्‍नागिरीमधील अस्पृश्यता निमूर्लनाचे कार्यकर्ता होते.ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिष्य होते .ते महार समाजात जन्मलेले हे नेते इ.स. १८८६ मध्ये ते लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर १८९४ साली त्यांनी मुंबई प्रांताच्या मुख्य लष्कराधिकाऱ्याला लांबलचक ‘विनंतीपत्र’ लिहून महार समाजाच्या व्यथा मांडल्या. हे विनंतीपत्र कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दलितांचा पहिला लिखित दस्तऐवज समजला जातो. एका परीने हे ‘विनंतीपत्र’ म्हणजे महार जातीच्या लढवय्या बाण्याचा इतिहासच आहे. इ.स. १८८८ मध्ये त्यांनी "विटाळ विध्वंसन" या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. त्यांनी स्थापन केलेली अनार्य दोष परिहार ही पहिली अस्पृश्योद्धारक संस्था समजली जाते. ते दलितांमधील पाहिले वृत्तपत्र वार्ताहार म्हणून ओळखले जातात. []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-27 रोजी पाहिले.