Jump to content

गोधडी

गोधडी हे कापडाचे तयार केलेले अंथरूण किंवा पांघरूण आहे. जुनी कापडे किंवा कपडे वाया जाऊ नयेत म्हणून ते एकत्र करून आणि धुऊन त्याची गोधडी बनवतात. पारंपरिक पद्धतीत गोधडी सुई-दोरा वापरून, सर्व कापडे व्यवस्थित अंथरून छोटे-छोटे टाके घालून शिवली जाते. ती आयताकार असते. त्याच्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कपड्याने नक्षी काढतात. तिला बाहेरच्या बाजूने कापणीच्या आकाराची नक्षी लावली जाते. गोधडी वर नाव किंवा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या ही लावतात. शिवणयंत्रावरही गोधड्या शिवता येतात.

गोधडीला वाकळ व लेपाटी असेही म्हणतात.