गोत्र
गोत्र ही एखाद्या पूर्वज पुरुषापासून अखंड चालत आलेल्या कुळाला स्थूलमानाने उद्देशून वापरली जाणारी हिंदू धर्मातील संज्ञा आहे. हिंदू परंपरांनुसार गोत्रे बहुधा वैदिक ऋषींच्या नावांवरून ओळखली जातात; उदा.: कश्यप गोत्र, वसिष्ठ गोत्र. हिंदू समाजामध्ये विभिन्न जातींनुसार, प्रादेशिक समाजांनुसार वेगवेगळी गोत्रे आढळतात. २ गोत्रे आणि प्रवरे[संपादन]
वर्णन
गोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्" असे केले आहे. म्हणजे "मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम". गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत. बौधायन सूत्रानुसार विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात.[ संदर्भ हवा ]
वर्गीकरण
गोत्रांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, पराशर, कुंदिन आणि वसिष्ठ(पहिल्या तीनमध्ये नसलेले). या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे वसिष्ठ, भारद्वसू व इंद्रप्रमाद; पराशर गोत्रातील प्रवरे वसिष्ठ, शाक्त्य व पाराशर्य; कुंदिना गोत्राची वसिष्ठ, मैत्रात्रवरुण व कौंडिण्य ही होत.[ संदर्भ हवा ]
आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र. यांची संख्या ८ आहे.
- विश्र्वमित्र
- जमदग्नी
- भारद्वाज
- गौतम
- अत्रि
- वशिष्ट
- कश्यप
- अगस्ती