गोठणे दोनीवडे
?गोठणे दोनीवडे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राजापूर |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | श्री.मुकेश विचारे |
बोलीभाषा | बाणकोटी कुणबी कोंकणी,मुस्लिम कोंकणी, |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
गोठणे दोनीवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.12 वाड्यांचे गाव हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे गाव आहे.गावामध्ये पाण्यासाठी अर्जुना नदी,देव टाके,नैसर्गिक झरे आणि विहिरी आहेत,सार्वजनिक पाण्यासाठी नैसर्गिक जलाशये अडवून आणि नदी काठी जॅकवेल बांधून पुरवठा केला जातो.गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे, पन्हाळ्याच्या मोहिमेवर जाताना छत्रपती शिवाजी महाराज येथे विसाव्यासाठी थांबले होते, तसे गावामध्ये मठ वाडी परिसरात भरपूर ऐतिहासिक वास्तू,भुयारे,गुहा,चौकी,समाध्या,मंदिरे आहेत. गावामध्ये तिलोरी कुणबी समाजाची लोकसंख्या जास्त आहे, हा समाज शेती कसणारा कष्टाळू आणि प्रामाणिक म्हणून ओळखला जातो कुणबी कुटुंबे राघव,हातणकर, नाचणेकर या आडनावाची आहेत,तसेच गावामध्ये मराठा कुटुंबे सुद्धा वास्तव्यास आहेत, पूर्वापार सरदारकी असल्यामुळे मराठा समाज हा सुशिक्षित,आणि सधन आहे. मराठा कुटुंबे खानविलकर,विचारे,धार पवार,मोहिते,जाधव,इंदुलकर या आडनावाची आहेत.आपल्या बुद्धी चातुर्य आणि धाडसी स्वभावामुळे गावामध्ये या मराठा कुटुंबियांना मान आहे, गावामध्ये स्वयंभू शंकर,सोमेश्वर,श्री गांगोदेव,बिरामण देव,चव्हाटा अशी देवस्थाने आहेत, या देवांचे उत्सव सोहळे गावा मध्ये मिळून मिसळून पार पाडले जातात. धार्मिक कार्यात सर्व जातींना परंपरा गत कमी अधिक मान आहे. गावामध्ये धार्मिक तेढ नाही, हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाज मिळून मिसळून राहत आहेत. पूर्वी गावचे नाव रावांचे गोठणे होते, पण एक 2 दशकांपूर्वी गावचे नाव सर्व संमतीने गोठणे दोनीवडे असे बदलण्यात आले.पूर्वी गाव 'राव' म्हणजे मराठा मानकरी म्हणतील तसे चालायचे, पण लोकशाही आल्यानंतर गाव हे सर्वांच्या अधिपत्या खाली आले.आज सर्व जातीय समाजाचे सदस्य शिकून नोकरी धंद्याला लागल्या मुळे वेठ बिगारी मागे पडली आणि सर्व समाज एक सारखे जीवन जगत आहेत.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/