Jump to content

गोठ

गोठ हा बायकांनी मनगटात घालायचा दागिना आहे. हा अनेक शतकांपासून वापरला जातो. गोठ हा एकावेळी दोन्ही हातात घातला जातो. हा दागिना सोन्याच्या भरीव किंवा पोकळ नळीपासून बनविलेला असून जाड गुळगुळीत बांगडीसारखा दिसतो. भरीव गोठात लाख भरलेली असते.
गोठ,पाटल्या, बिलवर,तोडे हे बांगड्यांचे प्रकार आहेत. त्यापैकी पाटल्या, बिलवर रोज घातले जातात तर तोडे, गोठ विशेष प्रसंगी घातले जातात.
गोठ तयार करण्यासाठी सोनार जे हत्यार वापरतात, त्याला गोठघोळणी असे म्हणतात. गोठ हे सोने धातू व प्लास्टिक मध्ये पण असतात.

इतिहास

प्राचीन हस्तभुषने

मनगटात धारण करण्यच्या अलंकारांना आवाषक, पारीहाय व वलय अशी नावे आहेत. वलय म्हणजे सोण्याची सलकडी किंवा बायकांचे गोठ होत. वलयात कनकवलय नावाचा एक प्रकार असुन त्यात चपट्या आकाराची रत्ने जडवलेली असत. असे शिल्प अमरावतिच्या स्तूपात आढळते. वलयाचा कनकवलय म्हणून कालीदासाने दोन ठिकाणी उल्लेख केला आहे. []

संदर्भ

  1. ^ भारतीय संस्कृती कोष खंड पहिला