गोचीड हा रक्त शोषणारा कीटक वर्गातील प्राणी आहे.तो बाह्य परजीवी कीटक आहे.तो रक्तपिपासू आहे.तो सहसा प्राण्यांच्या/जनावरांच्या अंगावर राहतो.महाराष्ट्रात झालेल्या एका गायी व म्हशींच्या अभ्यासात सुमारे ६७% ते ८७% प्राण्यांच्या अंगावर विविध प्रकारच्या गोचिड होत्या.[ संदर्भ हवा ]. भारतात सुमारे १६० प्रकारच्या गोचिड आढळून येतात.त्यापैकी 'बुफिलस हायलोमा' 'एम्ब्लीओमा' 'हेम्याफायसीलस' 'रिफीसीफॅलस' इत्यादी गोचिड जनावरांच्या रोगांचे दृष्टीने जास्त हानीकारक आहेत.
गोचिडांचे पशुंवर होणारे परिणाम
सर्व प्रकारच्या गोचिड जनावरांचे रक्त पितात.असे आढळून आले आहे कि, एक गोचिड सुमारे १ ते २ मि.ली. रक्त पिते. त्याचा कालावधी सुमारे ७ ते १४ दिवस राहू शकतो.मोठ्या जनावरांच्या शरीरावर अशा अनेक गोचिड असतात. त्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो.
गोचिडांच्या चाव्यामुळे जनावरांच्या शरीरावर जखमा होतात.त्वचा उघडी झाल्यामुळे त्यातून जंतूसंसर्ग होऊ शकतो.त्यामुळे 'टिक पॅरालीसीस' हा रोग जनावरांना होण्याची शक्यता असते.
जनावरांचे रक्तपेशीचे रोग जसे-'बॅबीओसीस','ॲनाप्लासमोसीस','थायलेरीयाओसीस', 'एरलीसियोसीस' व इतर या वर्गातील आजार प्राण्यांना गोचिडांमुळे होतात.गोचिडद्वारे या जंतूंचा फैलाव जनावरांमध्ये होतो व जनावरे रोगग्रस्त होतात.
गोचिडजन्य आजारांमुळे जनावरे रोगग्रस्त होतात व दगावतात.त्यांचे दूध व मांस उत्पादन घटते.पशुमालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.
उपाययोजना
यासाठी अनेक गोचिडनाशक औषधे उपलब्ध आहेत.पण ती विषारी आसतात.त्यांचा उपयोग पशुवैद्यक डॉक्टरांचे सल्ल्यानेच करावा.असेही बघण्यात आले आहे कि औषधाच्या कमी मात्रेने जनावर गोचिडमुक्त होत नाही तर, जास्त मात्रेने जनावरास विषबाधा होण्याचा संभव असतो.सहसा या औषधांची जनावरावर फवारणी करण्यात येते.