Jump to content

गोकु

गोकु । कॅकॅरॉट
राष्ट्रीयत्व जापानी
कार्यक्षेत्र मालिका
कारकीर्दीचा काळ १९८४ - चालू
वडील बरडॉक
आई जिने
पत्नी चीची
अपत्ये गोहन (मुलगा) आणि गोटेन (मुलगा)

गोकु हा अकिरा तोरीयामा लिखित ड्रॅगन बॉल ह्या मालिकेतील मुख्य पात्र असून काल्पनिक सुपरहिरो आहे. गोकु जर्नी टू वेस्ट (इंग्लिश) ह्या चिनी कादंबरी मधील सुन वुकॉंग ह्या प्रमुख पात्रावर आधारित आहे. ३ डिसेंबर, १९८४ रोजी विक्ली शोनेन जम्प ह्या जपानी नियकालिकात प्रसारित झाल्यानुसार ड्रॅगन बॉलच्या बुल्मा आणि सन गोकु ह्या पहिल्या भागात गोकु सर्वांसमोर आला. त्या मध्ये तो माकडा सारखी शेपटी असणार मार्शल आर्ट्स खेळणारा व असीम ताकद असलेला लहान मुलगा होता. बुल्मा आणि तो इच्छापूर्ती करणाऱ्या ड्रॅगन बॉल्सच्या शोधात प्रवासास निघतो.

आधी मानवी मानला जाणारा हा व्यक्ती, अस्तित्वात पृथ्वी बाहेरील लडाकेबाज गटातील, कॅकॅरॉट ह्या मुळ नावाचा, सैयन प्रजातीतील सदस्य असतो असे कालांतराने दाखवण्यात आले. जसे जसे गोकु मोठा होत जातो तसे अजून बलवान होत जातो आणि पृथ्वीला त्रास देणाऱ्या परग्रही प्राण्यांपासून पासून रक्षण करतो. इतर वेळी शांत आणि खुशमिजाज असलेला गोकु युद्ध वेळेत गंभीर तसेच मोक्याचा विचार करून वागणारा दाखविला आहे. गोकु आपली सर्व स्मरणशक्ती एकत्रित करून विनाशकारक उर्जारुपी हल्ला करू शक्तो. त्यातील सर्वात प्रमुख म्हणजे कामेहामेहा नामक निळ्या रंगाची उर्जा तरंग. त्याच प्रमाणे गोकु हा शुद्ध-चांगल्या मनाचा दर्शाविला आहे.

मुख्य पात्र असल्यामुळे गोकु ड्रॅगन बॉलच्या सर्व भागांमध्ये तसेच ड्रॅगन बॉलच्या सर्व चित्रपटांमध्ये दाखविण्यात आला आहे. ह्या मालिकेच्या जागतिक प्रसिद्धी मुले गोकु एक जग प्रसिद्ध एनिमेशन पत्र बनला आहे.