गोंसालो गार्सिया
गोंसालो गार्सिया, (पोर्तुगीज: Gonçalo Garcia) (इ.स. १५५६:वसई, महाराष्ट्र – ५ फेब्रुवारी, इ.स. १५९७) एक भारतीय ख्रिश्चन संत होते. त्यांचा जन्म मुंबईच्या उपनगर वसईमध्ये झाला. त्यावेळी जेव्हा भारतात पोर्तुगीज राज्य होते. गार्सिया पहिले भारतीय क्रिश्चन संत आहेत.[१] मुंबई व आसपासच्या प्रदेशातील ईस्ट इंडियन समुदाय आपले रक्षकसंत मानते.[२][३] ८ जून १८६२ रोजी पोप पायस नववा यांनी गोंसालो गार्सिना संत घोषित केले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "D'Mello, Ashley, "St Gonsalo Garcia: The 1st Indian saint", The Times of India, October 13, 2008". 2012-07-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-23 रोजी पाहिले.
- ^ http://www.east-indians.com/
- ^ "संग्रहित प्रत". 2017-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-23 रोजी पाहिले.