गोंधनखेडा
गोंधनखेडा हे गांव महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील एक गांव असून ते लहान गांव आहे.
इतिहास
"गोंधनखेडा" जाधव कुळातील लोकांनी वसवले असून ते मुळचे पुसेगांव येथील आहेत.
समाज
गांवात मराठा, आदिवासी, मातंग, मुसलमान, असून जास्त संख्या मराठा समाजाची आहे.
व्यवसाय
गांवातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
लोकसंख्या
"गोंधनखेडा" या गावाची लोकसंख्या ७०० (२००१ नुसार) आहे.
शैक्षणिक
गावांत ४ थ्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.
धार्मिक
हनुमान मंदिर
गांवात ग्रामदैवत हनुमान असून ते गांवाच्या पूर्वेस केंद्रा ते हाताळा या जुन्या पांदन रस्त्यावर असून त्या मंदिराचे बांधकाम २०१० मध्ये गांवकरी मंडळी यांच्या सहभागातून झाले असून या वर्षी (२०१७) मध्ये सभामंडपचे काम पूर्ण झाले.
देवी मंदिर
देवी मंदिर हे गावाच्या आग्नेय दिशेस असून ते उघड्यावर आहे.
महात्म्य गांवात फार पूर्वी मरी नावाचा रोग येऊन एकाच दिवशी अनेक लोक मरण पावत असत त्या मुळे गावांतील लोक देवीच्या कोपामुळे असे होत आहे असा समाज असल्यामुळे देवीला खुश करण्यासाठी लोक एक प्रकारचे तीन दिवसाचे व्रत करत, तीच परंपरा आजतागायत चालू आहे.
या व्रताला स्थानिक लोक "पत' म्हणतात.
पत/व्रत प्रारंभ दरवर्षी मराठी महिन्याच्या श्रावण शुद्ध प्रतिपदा या दिवशी प्रारंभ होवून पुढे तीन दिवस चालते.
पत/व्रत नियम :
तीन दिवस गावातील कोणत्याही समाजाच्या स्त्रीने अंघोळ (स्नान) करायचे नाही.
तीन दिवस डोक्याला तेल लावायचे नाही.
तीन दिवस पोळी लाटणे बंद. (ईतर पदार्थ करतात, किंवा थापून करतात)
तीन दिवस सर्व गावकऱ्यांनी जेवणात तेल,हळद, वर्ज आहे.
तीन दिवस गांवात कोणत्याही पर गावच्या लोकांना गावांत न येवू देणे.
तीन दिवस गावातील कोणत्याही समाजाची स्त्री पर गावच्या लोकांना एकही शब्द बोलणार नाही. (सख्खा भाऊ असला तरी)
तीन दिवस चहात दुध न टाकणे.
तीन दिवस बाई (स्त्री) बाहेरगांवी जावू न देणे. (बिमार असली तरी सुद्धा)
तिसऱ्या दिवशी सायंकाळी सर्व घरच्या आरत्याची ताटे घेऊन देवीची आरास करून नैवद्य देऊन आरती करून व्रताचे उद्यापन केले जाते.
आता मात्र शिक्षणामुळे फार नियम पाळल्या जात नाहीत. तरी pan अजूनही मात्र बराच समाज वरील नियम श्रद्धेने पाळतात.
राजकीय
गांवात ग्रामपंचायत स्वतंत्रपणे नसून ती शेजारील गांव "जामठी बुद्रुक" या गावांशी जोडलेली आहे. "ग्रुप ग्रामपंचायत जामठी बुद्रुक"
शेजारील गांवे
केंद्रा बुद्रुक, गोरेगांव, जामठी बुद्रुक, हाताळा, आजेगांव, ताकतोडा, या गावांच्या मधात गोंधनखेडा हे गांव आहे.
वैशिष्ठे
हे गांव उंच छोट्या डोंगरावर आहे.
हे गांवात नाही
नांव | उपस्थिती |
---|---|
सरकारी दवाखाना | नाही |
हॉटेल | नाही |
बस स्थानक | नाही |
हायस्कूल | नाही |
एस, टी, वाहतूक | नाही |
JCB | नाही |
ऑटो | नाही |
पाणीपुरवठा | नाही |
रुग्णवाहिका | नाही |
मेडिकल | नाही |