Jump to content

गोंदण

गोंदण म्हणजे सुई किंवा काटा यांच्या साहाय्याने अंगाच्या कातडीवर नक्षी काढणे किंवा शरीरावर काहीतरी चिन्ह, चित्र वा प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंदण. ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील ही एक कला होती/आहे.

स्वरूप

गोंदण्याची प्रथा कशी सुरू झाली याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही किंवा याविषयीचे लेखन, संदर्भही कुठे आढळत नाहीत. हर्बर्ट स्पेन्सर हा तत्त्ववेत्ता या कलेच्या निर्मितीसंबंधात म्हणतो, "अतिभौतिक शक्तीच्या भीतीपोटीही गोंदण कला उदयास आली असावी व तीद्वारा संबंधित व्यक्तीचे रक्षण होत असावे."[]

गोंदवून घेण्याबद्दलचे काही गैरसमज अजूनही लोकांमध्ये प्रचलित आहेत. एकदा टॅटू गोंदवल्यावर रक्तदान करता येत नाही, कारण टॅटू काढताना ती शाई तुमच्या रक्तात मिसळते व त्यामुळे ते अशुद्ध होतं. असं रक्त अन्य कोणासाठीही घातक ठरू शकतं, असं म्हटलं जातं. हे काही अंशी खरं असलं तरी नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार टॅटू गोंदवलेला माणूस सहा महिन्यांनी रक्तदान करू शकतो, असं डॉक्टरांनी मान्य केलं आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ गोखले, कमल; खोडवे, अच्युत. गोंदणे. मराठी विश्वकोश. ४ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ विदिशा कुलकर्णी. ‘गोंदण’गिरी. लोकसत्ता. 15-03-2018 रोजी पाहिले. भारतात गोंदवून घेण्याची कला प्राचीन काळापासून प्रचलित असली तरीही ती फक्त गावांपुरतीच एक प्रथा म्हणून मर्यादित राहिली. आता मात्र हाच गोंदवून घेण्याचा ट्रेंड सेलेब्रिटीपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनी डोक्यावर घेतला आहे. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)