Jump to content

गोंडी भाषा

गोंडी एक दक्षिण-मध्य द्रविड भाषा आहे. ही भाषा मुख्यतः मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि जवळच्या शेजारच्या राज्यांमधील जवळपास दोन दशलक्ष गोंड लोक बोलतात.[] ही गोंड लोकांची भाषा असूनही गोंडांपैकी फक्त एक पंचमांश लोक ही भाषा बोलू शकतात, ज्यामुळे ते विलुप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोंडीमध्ये समृद्ध लोक साहित्य आहे, यातील उदाहरणे म्हणजे विवाह गाणे आणि नाटके.

वैशिष्ट्ये

गोंडीत दोन-लिंग प्रणाली आहेत. मुळतत्त्वे पुल्लिंगी अथवा अन्य लिंगी असतात. प्रोटो-द्रविड पासून गोंडी भाषेची मार्गच्युती "इनिशिअल व्हॉइस्ट सटॉप्स" (ग, ज, ड, द, ब) आणि "ऍस्पिरेटेड सटॉप्स" (घ, झ, ढ, ध, भ) ह्या आवाजांच्या वाढीने सुरू झाली. 

बोलीभाषा 

गोंडीच्या बहुतेक बोलीभाषा अद्याप अपर्याप्तपणे नोंदवल्या गेल्या आणि वर्णित केल्या आहेत. डोरला, कोया, माडिया, मुरिया आणि राज गोंड या महत्त्वाच्या बोलीभाषा आहेत. काही मूलभूत ध्वन्यात्मक वैशिष्ट्ये दक्षिणेकडील बोलीभाषांना  उत्तरपश्चिमी बोलीभाषांपासून  विभक्त करतात. एक मूळ फरक प्रारंभिक "स" चा उपचार आहे, जो उत्तर व पश्चिम गोंडीमध्ये संरक्षित आहे, तर दक्षिणेत आणि पूर्वेत त्याचा "ह" झाला आहे; काही इतर बोलीभाषा मध्ये तो पूर्णपणे गमावला गेला आहे. इतर बोलीभाषांमध्ये प्रारंभिक "र" आणि "ल" चा फेरफार होतो आणि "ए " आणि "ओ" चा  "आ" होतो.

लेखन

गोंडी लेखन दोन प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते : तद्देशीय लिपी वापरून अंगीकृत लिपी वापरून.

पारंपारिकपणे, मोठ्या प्रमाणावर तद्देशीय लिपी उपस्थित नसल्यामुळे, गोंडी भाषेसाठी देवनागरी आणि तेलगू लिप्या अंगीकृत केल्या गेल्या आहे.

गोंडीसाठी मूळ लिपी तयार करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. सन १९२८ मध्ये, मुन्शी मंगल सिंग मसारम यांनी ब्रह्मी वर्णांवर आधारित आणि भारतीय वर्णमाले सारख्याच स्वरूपात गोंडी साठी एका तद्देशीय लिपीची रचना केली. तथापि, ही लिपी व्यापकरित्या वापरली गेली नाही आणि बहुतेक गोंड अजूनही निरक्षर आहेत.

महाराष्ट्र ओरिएंटल मॅन्यूस्क्रिप्ट लायब्ररी अँड रिसर्च सेंटर ऑफ इंडियाच्या मते, या लिपीमध्ये एक दर्जन हस्तलिखित सापडले आहेत. गोंडी लोकांमध्ये या लिपीबद्दलच्या जागरुकतेसाठी आणि ह्या लिपीची वाढ करण्यासाठी कार्यक्रम विकासाच्या टप्प्यात आहेत.

संदर्भ

  1. ^ Beine, David K. 1994. A Sociolinguistic Survey of the Gondi-speaking Communities of Central India. M.A. thesis. San Diego State University. chpt. 1