गेटिसबर्ग
गेटिसबर्ग अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील छोटे शहर आहे. ॲडम्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६ च्या अंदाजानुसार ७,७०० होती.
१-३ जुलै, १८६३ दरम्यान झालेल्या गेटिसबर्गच्या भीषण लढाईत सुमारे ४६,००० सैनिक ठार झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ येथे राष्ट्रीय दफनभूमी आहे. १९ नोव्हेंबर, १८६३ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकन यादवी युद्धादरम्यान येथे दिलेले भाषण जगभर प्रसिद्ध झाले.