गुलाम नबी आझाद
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च ७, इ.स. १९४९ डोडा जिल्हा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
गुलाम नबी आझाद (रोमन लिपी: Ghulam Nabi Azad) (मार्च ७, इ.स. १९४९ - हयात) हे राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. आझाद हे 2005 ते 2008 दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे ७ वे मुख्यमंत्री होते. तसेच ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते. फेब्रुवारी २०२१ पर्यंत त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.[१] त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये 27 ऑक्टोबर 2005 पर्यंत भारताचे संसदीय कार्य मंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांची जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2002च्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाचे यशस्वी नेतृत्व केले.
भारत सरकारने 2022 मध्ये त्यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.[२][३]ऑगस्ट 2022 मध्ये, आझाद यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर काही तासांनी जम्मू आणि काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोनिया गांधी यांनी आझाद यांचा राजीनामा स्वीकारला. 26 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी राहुल गांधींनी सल्लागार प्रक्रियेचा नाश केल्याचा उल्लेख केला आहे ४ सप्टेंबर २०२२ रोजी, आझाद यांनी काँग्रेस चा राजीनामा देऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमधील जनताच नाव ठरवेल, असे ते म्हणाले26 सप्टेंबर 2022 रोजी आझाद यांनी स्वतःचा राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक आझाद पार्टीची घोषणा केली.27 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव बदलून डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी केले.
राजकीय कारकीर्द
आझाद सर्वप्रथम इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये महाराष्ट्र राज्यातील वाशिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते इ.स. १९९० पासून इ.स. २००५ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांच्या राजवटीत केंद्रीय मंत्रिमंडळांत संसदीय कार्यमंत्री म्हणून काम सांभाळले. तसेच ते पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात नागरी विमान वाहतूकमंत्री होते. इ.स. २००५ ते इ.स. २००८ या काळात ते जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच मे, इ.स. २००९पासून ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री आहेत.
विवाद
जून, इ.स. २००८ मध्ये आझाद सरकारने जमीन हिंदू मंदिरांच्या नावे करण्याचा निर्णय घोषित केला. अनेक मुस्लिम संघटनांनी याचा विरोध करत निदर्शने केली. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला[ संदर्भ हवा ]. या निर्णयामुळे नाराज हिंदूंनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला, त्यातून उद्भवलेल्या दंगलींत ७ जणांचा बळी गेला[ संदर्भ हवा ]. आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने पाठिंबा काढून घेतल्याने आझाद सरकार बरखास्त झाले. आझाद यांनी जुलै ७, इ.स. २००८ रोजी पदाचा राजीनामा देत जुलै ११, इ.स. २००८ रोजी पद सोडले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Ghulam Nabi Azad : हिंदुस्तानी मुस्लिम असल्याचा गर्व, गुलाम नबींचं राज्यसभेतील अखेरचं भाषण". Maharashtra Times. 2022-01-26 रोजी पाहिले.
- ^ Bureau, The Hindu (2022-01-25). "Full list of Padma Awards 2022" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
- ^ "Padma Awards For Opposition's Ghulam Nabi Azad, Buddhadeb Bhattacharjee". NDTV.com. 2022-01-26 रोजी पाहिले.