गुलाम दस्तगीर
पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे एक संस्कृत पंडित आहेत. बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापुरातील महानगर पालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्रावीण्य मिळवले.
बिराजदार यांनी मुसलमानांचा कुराण-शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरित केला आहे. या ग्रंथात एकूण ६०० पाने आहेत.
दस्तगीर यांच्या तीनही मुलांची आणि नातीच्या लग्नाची पत्रिका संस्कृतमधून होती. तिच्यात वेदाच्या ऋचांचा समावेश होता.
पुस्तके
- वेदादि-शोधबोध
- मुस्लिम-संस्कृत-सेवका:
- 'विश्वभाषा' सम्पादकीयमौक्तिकानी
- मुस्लिमानां संस्कृताभ्यासो अन्ये चापि लेखा:
पुरस्कार
बिराजदार यांना एकूण १८हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांपैकी काही -
- राष्ट्रीय-शिक्षक-पुरास्कार केन्द्र शासनं १९८३
- संस्कृत-पण्डित्याय राष्ट्रपति पुरस्कार १९९८
- महाराष्ट्र राज्य-संस्कृत-पण्डित-पुरस्कार: महाराष्ट्र विधानसभा,१९९३
- उज्जैनहून परशुरामश्री
- तिरुपतीहून वाचस्पती
- नाशिकहून विद्यापारंगत
- वाराणसी येथून महापण्डित आणि पण्डितेंद्र
- सोलापूरहून संस्कृतरत्नम्
- पंडित बिराजदार हे औरंगाबाद येथे जानेवारी २०१८मध्ये झालेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनाचे खास निमंत्रित होते. वेदाचे अभ्यासक व संस्कृत पंडित म्हणून तेथे २१-१-२०१८ रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.