गुलबहार टबेबुया
गुलबहार टबेबुया Tabebuia argentea मुंबईतला आणखी एक भरगच्च फुलांनी ड़ंबरून येणारा वृक्ष म्हणजे टबेबुया. फेब्रुवारी- मार्च महिन्यात या निष्पर्ण वृक्षांच्या फिकट गुलाबी जांबळट छटेच्या फुलांची बहार मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर दिसते. वांद्रयापासून स्वामी विवेकांद रस्त्याच्या बाजूने याची अनेक झाडे आहेट. घाटकोपरच्या कॅज्युरीन वसाहतीत रसत्याच्या कडेने उंचच उंच वाढलेले टबेबुया हरीने फुलतात. आझाद मैदान आणि स्टर्लिंग, कॅपिटल सिनेमांच्या मधून येणारे हजारीमल सोमाणी रस्त्यावर याची सुंदर भरभरून फुलणारी झाडे आहेत. वेस्टर्न एकस्प्रेज हायवे यांची आरास मधुनच तुरळ दिसते. पण खरा राजस टबेबुया आहे.