गुरू तेग बहादुर नगर
गुरू तेग बहादूर नगर
गुरू तेग बहादूर नगर हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. गुरू तेग बहादूर नगर रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर एक स्थानक आहे. या भागाला पूर्वी कोळीवाडा नाव होते. येथे पंजाबी व्यक्ती मोठ्या प्रमाणात राहतात.
१९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीनंतर पंजाब येथून आलेल्या हिंदू व शीख निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी इथे इमारती बांधल्या होत्या. आज, ह्या इमारती मोडकळीस आल्या असून, मुंबई उच्च न्यायालयाने येथील रहिवाशांना त्यांची घरे रिकामी करण्याचा आदेश दिला आहे.