Jump to content

गुरू (ज्योतिष)

हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. पत्रिकेतील गुरू

कारकत्व

गुरू हा एक शुभ ग्रह असून शिक्षण, संतती, भाग्य  ह्याचा कारक आहे. गुरू हा सद्सदविवेक बुद्धी देतो. गुरू कोणत्याही गोष्टीचा खोलवर आणि व्यापक व सकारात्मक विचार करायला शिकवतो . कोणत्यही गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर व अगदी मुळापासून विचार करण्याची क्षमता गुरू मुळे मिळते. गुरू हा प्रपंचाचा कारक ग्रह आहे. गुरू चांगल्या पद्धतीने व सचोटीने प्रपंच करायला लावतो. गुरू हा आध्यात्मिक प्रगतीचा पण कारक ग्रह आहे. हा ग्रह समाजात मान मिळवून देणारा आहे. सत्कर्म करण्यासाठी आपल्याला कायम प्रेरित करणारा ग्रह आहे. आध्यात्मिक पिंड असणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत गुरूचा प्रभाव दिसून येतो. गुरू माणसाला त्याग शिकवतो .

पंचमेश

संतती विषयक प्रश्नाचा विचार करताना पण पत्रिकेत पंचम स्थान, पंचमेश ह्या बरोबरच संतती कारक गुरूला खूप महत्त्व आहे. तसेच शिक्षणाचा विचार करताना पण गुरू बघावा लागतो.

योग

पत्रिकेतील वक्री ग्रह किंवा स्तंभी गुरू शी जर पापग्रहांचे कुयोग असतील तर गुरू ज्या स्थानाचा भावेश आहे त्याचे किंवा  संतती किंवा शिक्षण ह्या दृष्टीने चांगली फळे  मिळत नाहीत.

दृष्टी

गुरूची दृष्टी शुभ  असते . गुरू स्वतः च्य स्थानापासून ५, ७, ९ ह्या स्थानाला बघत असतो म्हणजे त्या स्थानांवर व त्या स्थानातील ग्रहांवर गुरूची दृष्टी असते . उदा. समजा गुरू तृतीय स्थानात आहे तरची दृष्टी तृतीयापासून ५,७,९ म्हणजे सप्तम,नवम व लाभ स्थानांवर व त्या स्थानात असणाऱ्या ग्रहांवर असेल .

राशी परत्वे

कर्क राशीत गुरू उच्चीचा मानतात मकर राशीत गुरू निचीचा व कन्येत गुरू निर्बली मानतात . ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • अनुकूल भाव
  • प्रतिकूल भाव
  • बाधस्थान
  • अनुकूल राशी
  • प्रतिकुल राशी
  • मित्र ग्रह
  • सम ग्रह
  • नवीन ग्रहाशी
  • मूल त्रिकोण
  • स्वराशीचे अंश
  • उंच्च राशी कर्क
  • नीच राशी मकर
  • मध्यम गती
  • संख्या
  • देवता
  • अधिकार
  • दर्शकत्व
  • शरीर वर्ण
  • शरीरांगर्गत धातू
  • तत्त्व
  • कर्मेन्द्रिय
  • ज्ञानेन्द्रिय
  • त्रिदोषांपैकी दोष
  • त्रिगुणापैकी गुण
  • लिंग
  • रंग
  • द्र्व्य
  • निवासस्थान
  • दिशा
  • जाती
  • रत्न - पुष्कराज
  • रस
  • ऋतू
  • वय
  • दृष्टी पाच, सात, नऊ
  • उदय
  • स्थलकारकत्व
  • भाग्योदय वर्ष