गुरुदास अग्रवाल
गुरुदास अग्रवाल तथा स्वामी ज्ञानस्वरूप सानंद | |
---|---|
जन्म | गुरुदास अग्रवाल |
मृत्यू | ११ ऑक्टोबर २०१८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | स्वामी ज्ञानस्वरूप सानंद |
गुरुदास अग्रवाल तथा स्वामी ज्ञानस्वरूप सानंद हे पर्यावरणवादी कार्यकर्ते होते. गंगा नदी वाचवण्यासाठी आमरण उपषणाला बसलेले असताना १११ दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचे निधन झाले.[१]
पूर्वायुष्य
गुरुदास अग्रवाल ह्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील मुझप्फरनगर येथे झाला. त्यांनी रुडकी विद्यापीठातून (तेव्हा त्या संस्थेला आय. आय. टी.ची दर्जा मिळालेला नव्हता.) अभियांत्रिकीची पदवी मिळवली. पदवी मिळाल्यावर त्यांनी उत्तरप्रदेश राज्यशासनाच्या सिंचन-विभागात अभिकल्प (डिझाइन) ह्या विषयाचे अभियंता म्हणून नोकरी केली. बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली. [२]
प्रा. अग्रवाल हे १९६१ ते १९७६ ह्या कालावधीत आय. आय़. टी. कानपूर येथे पर्यावरणीय अभियंत्रिकी ह्या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.[३]
निवृत्तीनंतर १९९२ ते २००६ ह्या काळात ते चित्रकूट येथील महात्मा गांधी ग्रामोदय विश्वविद्यालयात त्यांनी काम केले.[४]
गंगेसाठी आंदोलने
२००६मध्ये गंगेचा मुख्य प्रवाह असणाऱ्या भागीरथी नदीवरील लोहारी-नाग-पाला जलविद्युतप्रकल्पाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांसह त्यांनी गंगा नदीची पाहणी केली. उत्तरकाशीच्या पुढे गंगेचे पात्र कोरडे असल्याचे त्यांना आढळले. त्यावर विचार करता; गंगेच्या पात्रावर होणाऱ्या धरणांमुळे हे घडते आहे हे त्यांना जाणवले आणि त्यांनी ह्याबाबत काम करण्याचे ठरवले.[४] गंगेचे प्रदूषण थांबवण्यासाठी जनआंदोलन उभारणे हे आपल्या आवाक्यातले नाही असे त्यांच्या लक्षात आले. मात्र गांधींजींचा उपोषणाचा मार्ग पत्करून एकट्या व्यक्तीलाही लढा देणे शक्य आहे असा विचार करून २००८मध्ये आपले उर्वरित जीवन गंगेसाठी वाहण्याचा संकल्प सोडला.[५]
पहिले उपोषण
गंगेवर सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे थांबवावीत ह्यासाठी अग्रवाल ह्यांनी १३ जून २००८पासून मणिकर्णिका घाटावर आमरण उपोषण सुरू केले.[५]
संदर्भ
संदर्भसूची
- दै. लोकसत्तेतील वृत्त : गंगा नदीसाठी १११ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जी.डी. अग्रवाल यांचे निधन. दि. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
- आय. आय. टी., कानपूर ह्यांच्या संकेतस्थळावरील माजी अध्यापकांच्या माहितीचे पान. दि. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
- अरुण तिवारी. गंगा-संकल्प-संवाद : भाग १ (हिंदी भाषेत). दि. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
- अरुण तिवारी. गंगा-संकल्प-संवाद : भाग २ (हिंदी भाषेत). दि. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
- अरुण तिवारी. गंगा-संकल्प-संवाद : भाग ३ (हिंदी भाषेत). दि. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
- अविनाश. कहानी प्रोफेसर जीडी अग्रवाल की, जिन्होंने IIT छोड़कर गंगा के लिए जान दे दी (हिंदी भाषेत). दि. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
- झाले गेले गंगेला... दि. २३ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
- मटा-अग्रलेख : गंगेची हाक. दि. २३ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
- अग्रवाल, जी. डी. (अनुवादक : अभिषेक श्रीवास्तव). पावन गंगा को खतरा ह्या पुस्तिकेतील काही भाग (हिंदी भाषेत). दि. २३ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)