गुरुंचे बारा प्रकार
बारा प्रकारचे गुरू
१ . धातुर्वादीगुरुः
शिष्याकडून तीर्थाटन करवून नाना साधनें सांगून शेवटीं ज्ञानप्राप्ति करून देतो .
२ . चंदनगुरुः
चंदनवृक्ष जसा आपल्या जवळच्या वृक्षांना आपल्यासारखाच चंदन बनवितो . पण ( पण हिंगणवेळू व केळें हे वृक्ष सोडून ) तसा अमक्त शिवायकरून आपल्या केवल समागमानेंच हा गुरू भक्तांस तारून नेतो .
३ . विचारगुरुः
नित्यानित्यविचारानें शिष्यास ज्ञान करून देऊन पिपीलिकार्मानें साक्षात्कार करून देतो .
४ . अनुग्रहगुरुः
शिष्याव्र कृपानुग्रह करतो . त्याच्या प्रतापानेंच सायास न होतां शिष्यास ज्ञान होतें .
५ . परीसगुरुः
परीस ज्याप्रमाणें स्प्रर्शमात्रेंकरून लोह तें सुधर्ण बनवितो त्याप्रमाणें स्पर्शानें शिष्यास गुरुत्व प्राप्त होतें .
६ . कच्छपगुरुः
कूर्म म्हणजे कासवी ज्याप्रमाणें नुसत्या अवलोकनानें पिलांचें पोषण करिते , त्याप्रमाणें हा कृपावलोकनानेंच शिष्याचा उद्धार करतो .
७ . चंद्रगुरुः
चंद्र उदय पावतांच चंद्रकांतास पाझर फुटतो , त्याप्रमाणें याचें अंतर द्रवतांच दूरचे शिष्यही तरतात .
८ . दर्पणगुरुः
आरशांत पाहिल्याबरोबर आपलें मुख आपणांस दिसतें . त्याप्रमाणें त्याच्या नुसत्या दर्शनानें स्वरूपज्ञान होतें . कसलेच आयास पडत नाहींत .
९ . छायानिधिगुरुः
छायानिधि या नांवाचा एक मोठा पक्षी आकाशांत फिरत असतो . त्याची छाया ज्याच्यावर पडते तो राजा होतो . त्याप्रमाणें ह्या गुरूची छाया ज्याच्यावर पडते तो तत्काळ स्वानंद साम्राज्याधिपति होतो .
१० . नादनिधिगुरुः
नादनिधि नांवाचा मणि आहे . ज्या धातूचा घ्वनि त्याच्या कानांत पडतो त्या सर्व धातू स्वस्थानीं सुवर्ण बनतात . त्याप्रमाणें मुमुक्षूची करुणवाणी त्याच्या कानीं पडतांच मुमुक्षूस दिव्य ज्ञान होतें .
११ . क्रौंचपक्षीगुरुः
क्रौंच नांवाची पक्षीण समुद्रतीरीं पिलें ठेवून चारा घेण्यासाठीं सहासहा महिने दूरदेशीं फिरावयास जाते . व बारंबार आकाशाकडे डोळे करून पिलांची आठवण करते . त्या योगानें तेथें पिलें पुष्ट होतात . त्याचप्रमाणें हा गुरू ज्यांची आठवण करितो ते आपापल्या स्थानीं असतांच तरून जातात .
१२ . सूर्यकांतगुरुः
सूर्यदर्शनानें सूर्यकांत मण्यांत अथवा भिंगांत अग्नी पडतो व खालीं घरलेला कापूस जळून जातो . ( सूर्याची इच्छा नसतांनाहीं ) त्याप्रभाणें ह्या गुरूची द्दष्टि जिकडे झळकतेते पुरुष तात्काळ विदेहत्व पावतात . रुद्रयामलांत सांगितलें आहे कीं , ग्रंथवाचनानेंच व गुरुप्राप्तीशिवाय जपतपादि साधनें केलीं तर त्यांच्या विशेष उपयोग होणार नाहीं . अधिकारी गुरूशिवाय इष्टदेवता साधन प्राप्त होणार नाहीं . गुरुतंत्रांत सांगितलें आहे कीं ," शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन । तस्मात् शुद्धमना नित्यं तमेवाराधयेत् गुरुं " श्रीसमर्थ रामदासस्वामींनीं नवविधा भक्तीचें वर्णन करितांना अर्चन व पादसेवन गुरूचेंच करावें असें सांगितलें आहे . त्याचें रहस्य हेंच होय