गुरमीत सिंह मीत हायर
Politician from Punjab, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल २१, इ.स. १९८९ बर्नाला | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
गुरमीत सिंह मीत हायर हे २०२४ पासून संगरूर मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत. २०१७ आणि २०२२ मध्ये ते बर्नाला मतदारसंघातून दोन वेळा पंजाब विधानसभेचे आमदार होते. पंजाब सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार केवलसिंग ढिल्लन यांचा पराभव करून त्यांनी २०१७ मध्ये पहिल्यांदा आम आदमी पक्षाकडून विधानसभेची निवडणूक जिंकली.[१] २०२२ च्या विधानसभेच्या निवडणुकीत, त्यांनी बर्नाला मतदारसंघात जवळपास ५०% मते मिळवून पुन्हा मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी मान मंत्रालयात उच्च शिक्षण आणि भाषा, प्रशासन सुधारणा, क्रीडा आणि युवक सेवा, विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण आणि मुद्रण खात्याचे मंत्री यासारखे विविध महत्त्वाचे खाते सांभाळले.[२][३] पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या युवा विंगचे ते प्रभारीही आहेत.[४]
संदर्भ
- ^ "Kewal Dhillon defeated - AAP candidate Meet Hayer wins Barnala Assembly Poll" (इंग्रजी भाषेत). 31 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "The playing 11: CM Bhagwant Mann's cabinet ministers". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 20 March 2022. 22 March 2022 रोजी पाहिले.
- ^ "Mann keeps Home, 26 others, gives Finance to Cheema; Mines to Bains" (इंग्रजी भाषेत). 22 March 2022. 23 March 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 March 2022 रोजी पाहिले.
- ^ "Akalis defaming farmers: AAP". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 22 September 2021. 25 March 2022 रोजी पाहिले.