गुमठी
भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या समतल पारणांवर (रेल्वे लेव्हल क्रॉसिंग) गेटमनचे उन्हा-पावसापासून रक्षण करण्यास त्याजवळच बांधण्यात आलेल्या खोलीस गुमठी असे म्हणतात. गाडी येत असल्याची सूचना देणारी यंत्रणा यात बहुदा बसविण्यात आलेली असते.त्याद्वारे सूचना मिळाल्यावर, 'गेटमन' या पारणावरील रस्ता वाहतूकीसाठी बंद करतो व गाडी गेल्यावर तो परत सुरू करतो. रेल्वे वाहतूक ही दिवसाचे २४ तास सुरू रहात असल्यामुळे येथे कायम रेल्वेचा कर्मचारी तैनात असतो.गाडी वाहतूक सुरळीत विनाथांबा सुरू रहावी व नागरिकांना अपघात होऊ नये म्हणून ही योजना केलेली असते.