Jump to content

गुढीपाडवा शोभायात्रा

हातात गुढी प्रतिकृती घेतलेल्या महिला

गुढीपाडवा या हिंदू नववर्ष सणाच्या निमित्ताने होणारी शोभायात्रा हा एक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आहे. हिंदू नववर्ष स्वागतासाठी हिंदू संस्कृतीची आठवण करून देणारी शोभायात्रा महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये साजरी केली जाते.[]

स्वरूप

या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. महिला-पुरुष, लहान मुले आणि मुली पारंपरिक पोशाखात यामधे सहभागी होतात.[] महाराष्ट्राच्या विविध शहरातून या शोभायात्रेचे आयोजन केले जाते. ढोल ताशा पथक, महाराष्ट्रातील कर्तृत्ववान स्त्री पुरुषांच्या वेशभूषा केलेले सदस्य, लेझीम पथके, चौघडा वादन, सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी, शाळा व महाविद्यालये यांची पथके यांचा या यात्रेत समावेश होतो.[]

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ "पुण्यात गुढी पाडव्या निमित्त भव्य शोभायात्रा." एबीपी माझा. 2023-03-22. 2024-03-29 रोजी पाहिले.
  2. ^ "जल्लोष नववर्षाचा! गुढीपाडव्याची मुंबईत जय्यत तयारी; शोभायात्रा, शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक". महाराष्ट्र टाइम्स. 2024-04-22 रोजी पाहिले.
  3. ^ "कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा". लोकसत्ता. 2024-04-09. 2024-04-22 रोजी पाहिले.