Jump to content

गुटीकलम

मातृव्रुक्षाच्या झाडांच्या फांदीची साधारण अडीच सें. मी. रुंदीची गोलाकार साल काढून त्या भोवती शेवाळ (ओलसर ) पोंलिथीनने बांधून अशा प्रकारचे कलम बांधतात. आपल्याकडे पेरु, डाळिंब यांची मोठ्या प्रमाणात अभिवृद्धी या पद्धतीनेच करतात. पोंलिथीनचा शोध लागण्यापूर्वी या गुटीभोवती चिखलमातीचा गोळा लावून गोणपाटाने बांधून ते ओले ठेवण्याकरता वरच्या फांदीवर मडके बांधून त्या बांधलेल्या जागी पाणी ठिबकत ठेवण्याची व्यवस्था करीत. ही व्यवस्था फार किचकट व ञासदायक होती. पण हल्ली संजीवकांचा वापर , शेवाळ व पोंलिथीनचा वापर यामुळे गुटीकलमामध्ये क्रांतीझाली आहे.