Jump to content

गुझेरात गाय

गुझेरात गाय
ब्राझील मधील गुझेरात बैल
आढळस्थानसाओ पाउलो, मिनास जेराईस, गोयाएस, रियो दि जानेरो, राज्य-ब्राझील
मानकFAO
उपयोग दुधदुभते, मांसाहार []
वजन
  • बैल:
    ९०० किलो
  • गाय:
    ६०० किलो
उंची
  • बैल:
    अनुपलब्ध
  • गाय:
    अनुपलब्ध
  • गाय
  • Hybrid Bos (primigenius) taurus/indicus

गुझेरा किंवा गुझेरात हा ब्राझील देशातील एक संकरित गोवंश असून, हिचा मूळ गोवंश गुजरातमधील कांकरेज गाय आहे. त्यामुळे या गोवंशाला कांकरेज किंवा अझुलेगो असेसुद्धा म्हणतात. इ.स. १८७० मध्ये भारतीय 'कांकरेज' आणि ब्राझीलमधील 'क्रिउलो' यांच्या संकरातून हा नवीन गोवंश निर्माण झाला. अमेरिकेतील ब्राह्मण गाईच्या निर्मितीत या गोवंशाचा प्रामुख्याने वापर करण्यात आला.[][]

गुझेरात गोवंशात भारतीय कांकरेजचा आकार, रंग आणि गुणधर्मसुद्धा मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे हा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा सहज टिकतो. याची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असून कातडे जाड असल्यामुळे रक्तशोषक किडींचा प्रादुर्भाव सुद्धा कमी दिसून येतो.[] या व इतर गुणधर्मामुळे गुझेरात गोवंश ब्राझील मध्ये चांगलाच पसरला. इ.स. २०१० मध्ये गुझेरातची संख्या ९२,००० पर्यंत पोहोचली. ही ब्राझीलमधील एकूण पशुधनाच्या ३% आहे.[]

चित्र दालन

भारतीय गायीच्या इतर जाती

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Kankrej or Guzerat" (इंग्रजी भाषेत). 2018-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b Valerie Porter, Lawrence Alderson, Stephen J.G. Hall, D. Phillip Sponenberg (2016). Mason's World Encyclopedia of Livestock Breeds and Breeding (sixth edition). Wallingford: CABI. ISBN 9781780647944.CS1 maint: multiple names: authors list (link)
  3. ^ a b "Kankrej" (इंग्रजी भाषेत). २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.