गुजरात विधानसभा निवडणूक, २०१२ ही गुजरात राज्यामधील विधानसभा निवडणुक होती. ह्या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले गेले. २००१ पासून मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षने पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन देऊन ११६ जागांवर विजय मिळवत बहुमत राखले. पुढे २०१४ लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपतर्फे पंतप्रधानपदाचे दावेदार असलेले मोदी लोकसभेमध्ये विजय मिळवून भारताचे पंतप्रधान बनले व त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडले.
निवडणूक कार्यक्रम
टप्पा १
क्र. | घटना | दिनांक |
---|
१ | कार्यक्रम जाहीर | ३ ऑक्टोबर २०१२ |
२ | कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात | १२ ऑक्टोबर २०१२ |
३ | उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस | १७ ऑक्टोबर २०१२ |
४ | उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस | १८ ऑक्टोबर २०१२ |
५ | उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस | २० ऑक्टोबर २०१२ |
६ | निवडणुकीची तारीख | १३ डिसेंबर २०१२ |
७ | मतमोजणीची तारीख | २० डिसेंबर २०१२ |
टप्पा २
क्र. | घटना | दिनांक |
---|
१ | कार्यक्रम जाहीर | ३ ऑक्टोबर २०१२ |
२ | कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात | २३ नोव्हेंबर २०१२ |
३ | उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस | ३० नोव्हेंबर २०१२ |
४ | उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस | १ डिसेंबर २०१२ |
५ | उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस | ३ डिसेंबर २०१२ |
६ | निवडणुकीची तारीख | १७ डिसेंबर २०१२ |
७ | मतमोजणीची तारीख | २० डिसेंबर २०१२ |
मतदान
टप्पा १
- एकूण मतदारसंघ: ८७
- उमेदवार: ८४६ (पैकी ४७ महिला)
- मतदारांची एकूण संख्या :
- मतदान केंद्राची संख्या :२१,२६८
- एकूण मतदान: ७०.७५%
टप्पा २
- एकूण मतदारसंघ: ९५
- उमेदवार: ८२० (पैकी ४९ महिला)
- मतदारांची एकूण संख्या :
- पुरुष : १,९९,३३,५४३
- महिला : १,८१,४३,७१४
- एकूण : ३,८०,७७,४५४
- मतदान केंद्राची संख्या :४४,५७९
- सर्वाधिक उमेदवार असणारे केंद्र :हिरातनगर - १८ उमेदवार
- सर्वांत कमी उमेदवार असलेले केंद्र : फतेपूर- ३ उमेदवार
- सर्वाधिक मतदार असलेले केंद्र : कामरेज (३,०,४६२१ मतदार)
- सर्वांत कमी मतदार असलेले केंद्र : कुडाळ (१८६,१८५ मतदार)
- सर्वाधिक म्हणजे १ पेक्षा अधिक महिला उमेदवार असलेला मतदारसंघ- ७
- एकूण मतदान: ७१.८५%
गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार
गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार
संदर्भ व नोंदी