गुंदेचा बंधू
उमाकांत, रमाकांत (जन्म : उज्जैन, २४ नोव्हेंबर १९६२; - भोपाळ, ८ नोव्हेंबर २०१९) व अखिलेश गुंदेचा हे तीन बंधू आपल्या ध्रुपद गायकीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील चांदमल गुंदेचा. रमाकांत गुंदेचा हे उज्जैनच्या माधव काॅलेजातून १९७७मध्ये पदवीधर झाले.
गुंदेचा बंधू सन १९८२मध्ये भोपाळ येथे, उस्ताद झिया मोहिउद्दीन डागर व उस्ताद झिया फरीदुद्दीन डागर यांच्याकडे ध्रुपद गायकी शिकायला आले, आणि त्यानंतर त्यांनी काही वर्षांतच ध्रुपदगायनात पराकाष्ठेची प्रगती केली. उमाकांत-रमाकांत गुंदेचा यांनी १९८५ साली पहिल्यांदा भोपाळमध्ये जाहीर कार्यक्रम केला. त्यांचे शेवटचे गायनही भोपाळमधील 'विश्व रंग' कार्यक्रमात ७ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले.
गुंदेचा बंधूंनी ४ नोव्हेंबर २००२ रोजी भोपाळमध्ये ध्रुपद संगीत केंद्र गुरुकुलाची स्थापना केली.
रमाकांत गुंदेचा यांना मिळालेले सन्मान
- सन २०१२मध्ये पद्मश्री
- १९९८ साली मध्य प्रदेश सरकारकडून कुमार गंधर्व पुरस्कार.
- सन २०१७मध्ये संगीत नाटक अकादमी ॲवाॅर्ड
- २०१७मध्ये मध्य प्रदेश गौरव सन्मान