Jump to content

गुंड्याचा पाडा

किन्हवली पासून दोन किमी वरील हे एक निसर्गरम्य गाव. गावाच्या चारही बाजूला हिरवी गर्द झाडी उत्तरेला उंच टेकडीच्या मागे कानावे गाव, पश्चिमेला किन्हवली, दक्षिणेला वाचकोले तर पूर्वेला चिखलगाव. येथे प्रामुख्याने आंब्याची तसेच जांभळाची झाडे आहेत तसेच साग, मोह, खैर, किनई, अकेशी इत्यादी झाडे आहेत. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय चालतो. येथील जवळ जवळ वीस ते पंचवीस दूधवाले दररोज मुंबईला दुध पुरवितात. या गावाला २००८ साली तंटामुक्ती गाव म्हणून एक लाख रुपयाचे पारितोषिक मिळाले. 19°21'46.97"N

73°29'41.77"E