गुंटकल जंक्शन रेल्वे स्थानक
गुंटकल जंक्शन గుంతకల్లు జంక్షన్ भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | गुंटकल, आंध्र प्रदेश |
गुणक | 15°10′30″N 77°22′1″E / 15.17500°N 77.36694°E |
मार्ग | मुंबई−चेन्नई रेल्वेमार्ग गुंटकल-हुबळी रेल्वेमार्ग गुंटकल-बंगळूर रेल्वेमार्ग गुंटकल-विजयवाडा मार्ग |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८७२ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | GTL |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण मध्य रेल्वे |
स्थान | |
गुंटकल |
गुंटकल जंक्शन (तेलुगू: గుంతకల్లు జంక్షన్) हे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील गुंटकल शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले गुंटकल जंक्शन देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. मुंबई-चेन्नई मार्ग येथून जातो व त्याचबरोबर येथून बंगळूर, मडगाव व विजयवाडा ह्या शहरांकडे देखील रेल्वेमार्ग जातात. त्यामुळे मुंबईहून चेन्नई, बंगळूर, कोइंबतूर इत्यादी शहरांकडे तसेच बंगळूरहून दिल्ली, कोलकाता शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या गुंटकलमार्गे जातात.
रोज थांबा असणाऱ्या गाड्या
- लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस
- मुंबई-चेन्नई मेल
- उद्यान एक्सप्रेस
- दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस
- कर्नाटक एक्सप्रेस
- अमरावती एक्सप्रेस
- हरीप्रिया एक्सप्रेस
- रायलसीमा एक्सप्रेस