Jump to content

गीता अय्यंगार

गीता अय्यंगार ( ७ डिसेंबर,१९४४ पुणे - १६ डिसेंबर २०१८, पुणे) या भारतीय योगशिक्षिका होत्या. या योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांची मोठी मुलगी होत्या. त्यांनी स्त्री स्वास्थ्यासाठी योगासनांचा पुरस्कार केला.[]

जीवन आणि कार्य

अय्यंगारांनी त्यांच्या वडिलांकडून अगदी लहानपणीच योग शिकण्यास सुरुवात केली. १९६१ साली महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर, वडील इतर देशांच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी वडिलांच्या जागी शिकविण्यास सुरुवात केली. १९८४ साली त्यांच्या वडिलांनी या कामातून निवृत्ती घेतल्यानंतर[], त्यांनी त्यांचे बंधू प्रशांत अय्यंगार (जन्म: १९४९) यांच्यासोबत रमामणी अय्यंगार मेमोरिअल योग संस्थेचे (आर.आय.एम.वाय.आय.) काम बघण्यास सुरुवात केली.[] यासोबतच त्यांचे परदेशात योगाच्या प्रसाराचे काम चालूच होते.

शिकवण

स्त्रियांच्या विविध गरजा डोळ्यासमोर ठेवून अय्यंगारांनी योगाचा अभ्यास केला. स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांसाठी, जसे की मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती नंतर आणि रजोनिवृत्ती झाल्यावर करावयाची विशिष्ट आसने, प्राणायाम आणि त्यांचा योग्य क्रम त्यांनी दिला. आपल्या वडिलांप्रमाणेच अय्यंगार मन आणि शरीर यांचा योग कसा साधायचा आणि श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, स्नायू, अधिचर्म आणि मनाला सक्षम कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करतात.

अयंगार संस्थेत काम करण्याबरोबरच, त्यांनी विदेशातही अयंगार योग प्रसाराचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. त्यांनी प्रसाराचे काम केलेले मुख्य प्रदेश पुढील प्रमाणे आहेत.

याशिवाय त्यांनी अनेक देशांमधे योग प्रशिक्षकांना तयार केले आहे, उदा. इटली.

अय्यंगार यांनी लिहिलेली पुस्तके

  • शांतीयोग[]
  • योगा: अ जेम फॉर वुमेन[]
  • योगा इन ॲक्शन - प्रिलीमिनरी कोर्स []
  • द वुमेन्स योगा बुकः आसना अँड प्राणायामा फॉर ऑल फेजेस ऑफ द मेंस्ट्रूअल सायकल: क्लेनेल बॉबी यांच्यासह लेखन [१०]
  • अय्यंगार योगा फॉर मदरहूड: सेफ प्रक्टीस फॉर एक्स्पेक्टंट अँड न्यू मदर्स[११]

संदर्भ

  1. ^ MUNGEN, DONNA. "Mastering the Meeting of Mind and Body". Los Angeles Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0458-3035. 2018-10-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Iyengar Yoga: 'Food for the Spirit'". www.beliefnet.com (इंग्रजी भाषेत). 2018-10-14 रोजी पाहिले.
  3. ^ "B K S Iyengar - Geeta S.Iyengar". bksiyengar.com. 2018-10-14 रोजी पाहिले.
  4. ^ "we are all karma yogis". web.archive.org. 2011-11-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-07 रोजी पाहिले.
  5. ^ Morton, Colleen. "In Her Father's Light". Yoga Journal (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी पाहिले.
  6. ^ "An Odyssey with Geeta Iyengar". www.yogachicago.com. 2019-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-07 रोजी पाहिले.
  7. ^ 1944-, Iyengar, Geeta S.,; गीता., अय्यंगार,. Śāntiyoga : yogasādhanecī prāthamika, mādhyamika āṇi pragata vāṭacāla = Shantiyog (Pahilī āvr̥ttī ed.). Puṇe. ISBN 9789382591931. OCLC 957220738.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  8. ^ 1944-, Iyengar, Geeta S., (2002). Yoga : a gem for women. Spokane, WA: Timeless Books. ISBN 0931454980. OCLC 48711316.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  9. ^ अय्यंगार, गीता (२०००). योगा इन ॲक्शन. ISBN ISBN 978-81-87603-01-6 Check |isbn= value: invalid character (सहाय्य).
  10. ^ 1943-, Clennell, Bobby, (2007). The woman's yoga book : asana and pranayama for all phases of the menstrual cycle (1st ed ed.). Berkeley, Calif.: Rodmell Press. ISBN 1930485182. OCLC 76416634.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link) CS1 maint: extra text (link)
  11. ^ 1944-, Iyengar, Geeta S., (2010). Iyengar yoga for motherhood : safe practice for expectant & new mothers. Keller, Rita., Khattab, Kerstin. New York: Sterling. ISBN 9781402726897. OCLC 587603837.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)