Jump to content

गिरीश जोशी

गिरीश जोशी (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी नाटककार, नाट्यदिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता आहे. याने इ.स. १९८८पासून व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केली. याने लिहिलेली 'अभिनेत्री’', ’'फायनल ड्राफ्ट’ आणि, 'लव्ह बर्ड्स' ही नाटके विशेष गाजली. नाट्यलेखन व दिग्दर्शनाशिवाय याने मराठी चित्रपटांतून अभिनयही केला आहे. दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी ह्यांची पत्नी होती.

महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धेत गिरीश जोशींनी लिहिलेल्या बाभुळबन नाटकास पारितोषिक मिळाले होते.[ संदर्भ हवा ]. ही एकांकिका नंत ’अबोली’ या नावाने व्यावसायिक रंगभूमीवर सादर झाली. त्याचे निर्माते महेश मांजरेकर होते. त्यांनी या नाटकात कामही केले होते.


गिरीश जोशी यांनी लिहिलेली नाटके

  • अबोली (’बाभुळबन’चे रंगभूंमीवरील नाव)
  • अभिनेत्री
  • काटकोन त्रिकोण
  • फायनल ड्राफ्ट
  • बाभुळबन (एकांकिका, १९९२ च्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पहिला क्रमांक)
  • माकडाच्या हाती शॅंपेन (मूळ नाव - मारुतीच्या हाती शॅंपेन, आधी प्रायोगिक आणि नंतर व्‍यावसायिक झालेले नाटक)
  • लव्ह बर्ड्स (हेही आधी प्रयोगिक रंगभूमीवर आले. प्रमुख भूमिका मुक्ता बर्वे)

पटकथा

  • एक डाव धोबीपछाड
  • काकस्पर्श

दूरचित्रवाणीसाठी लिहिलेल्या मालिका

  • असंभव
  • ‘आभाळमाया
  • प्रारब्ध
  • बंधन
  • भूमिका