Jump to content

गिरिराज किशोर

आचार्य गिरिराज किशोर (४ फेब्रुवारी, इ.स. १९२०:मिसौली, एटा जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - १३ जुलै, इ.स. २०१४) विश्‍व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक होते. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्याच्या मिसौली नावाच्या छोट्या गावात झाला. त्यांनी अलीगढ येथून शिक्षण घेतले.

कार्य

नंतर आग्रा येथे वास्तव्यास असतानाच संघाचे प्रचारक दीनदयाल आणि भव जुगादे यांच्या संपर्कात आले. देशप्रेमाच्या विचारांनी ते भारले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वयंसेवक झाले. काही काळानंतर प्रचारक म्हणून काम करू लागले. त्यांनी मैनपुरी, आग्रा, भरतपूर, धौलपूर येथे काम केले. १९४८ साली संघावर विनाकारण बंदी घातली गेली. यामध्ये त्यांनाही गोवले गेले. ते बनारसच्या कारागृहात १३ महिने बंदिस्त राहिले. याकाळात त्यांना उच्च शिक्षणाची गोडी वाटली. त्यांनी बी.ए. व नंतर इतिहास, हिंदी व राज्यशास्त्र या विषयांत एम.ए. केले. १९४९ ते १९५८ पर्यंत त्यांनी ओरिसा राज्यात प्रचारक म्हणून काम केले. काही काळानंतर त्यांनी मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील अडोखर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही काम केले. काही काळातच त्यांच्यातला कार्यकर्ता जागा झाला व अ. भा. विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि नंतर संघटन मंत्री या पदांवर ते कार्य करू लागले. नंतर त्यांनी राजस्थानला हेच कार्य केले.

मीनाक्षीपुरमचे धर्मांतर

१९७९ साली मीनाक्षीपुरम येथील तीन हजार हिंदूंचे मुसलमानांनी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे इंदिरा गांधी अस्वस्थ झाल्या व त्यांनी संघाची मदत मागितली. यावेळी विराट हिंदू समाज नावाच्या संस्थेची स्थापना केली गेली. संघाच्या वतीने अशोक सिंघल आणि आचार्य गिरिराज किशोर यांनी याचे नेतृत्व केले. हिंदूंना परत धर्मात आणले.

१९८३ साली एकात्मता यात्रेचे नियोजन त्यांनी केले.

पुढे त्यांनी खालील कामे केली.:

  • संस्कृती रक्षा योजना -स्थापना
  • द्वितीय एकात्मता यज्ञ यात्रा
  • राम जानकी यात्रा
  • रामशिला पूजन
  • राम ज्योती अभियान
  • रामंदिराचा शिलान्यास

आतरराष्ट्रीय एकात्मता

इंग्लंड, हॉलंड, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, रशिया, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, इटली, मॉरिशस, मोरोक्को, गयाना, नैरोबी, श्रीलंका, नेपाळ, भूतान, सिंगापूर, जपान, थायलंड आदी देशांना भेटी देऊन तेथील हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.

वैज्ञानिक दृष्टी

त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्र आणि त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला.

पुरस्कार

  • आचार्य गिरिराज किशोर यांना भारत सरकारने इ.स. २००७मध्ये साहित्य आणि शिक्षण यांतील कार्यासाठी पद्मश्री हा पुरस्कार दिला.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे