गिरिजा व्यास
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै ८, इ.स. १९४६ Nathdwara | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
नियोक्ता |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
गिरिजा व्यास (जन्म ८ जुलै १९४६) एक भारतीय राजकारणी, कवयित्री आणि लेखिका आहेत. त्या चित्तोडगड मतदारसंघातून १५व्या लोकसभेच्या सदस्य होत्या आणि भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या.
वैयक्तिक जीवन
गिरिजा व्यास यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी कृष्णा शर्मा आणि जमुनादेवी व्यास यांच्या घरी झाला.[१]
तत्त्वज्ञानात डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी उदयपूरच्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ आणि अमेरिकेतील डेलावेर विद्यापीठात अध्यापन केले.
त्यांनी आठ पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी तीन कवितासंग्रह आहेत. एहसास के पार मध्ये त्यांच्या उर्दू कविता आहेत, सीप, समुद्र और मोती मध्ये त्यांच्या हिंदी आणि उर्दू कविता आहेत तर नॉस्टॅल्जिया ह्या संग्रहात इंग्रजी कविता आहेत.[२]
राजकीय कारकीर्द
१९८५ मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून, त्या उदयपूर, राजस्थान येथून विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आणि १९९० पर्यंत राजस्थान सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले. [३]
१९९१ मध्ये, त्या लोकसभेत उदयपूर, राजस्थानचे प्रतिनिधित्व करत भारतीय संसदेत निवडून आल्या आणि नरसिंह रावांच्या मंत्रालयात भारत सरकारमध्ये उपमंत्री (माहिती आणि प्रसारण) म्हणून नियुक्ती झाल्या.
- १९९३: अध्यक्ष, अखिल भारतीय महिला काँग्रेस;
- १९९३-९६:
- सदस्य, सल्लागार समिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय;
- सदस्य, सदन आणि परदेश विषयक स्थायी समिती
- १९९६: ११व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आल्या
- सदस्य, राजभाषा समिती
- सदस्य, महिला सक्षमीकरण समिती
- सदस्य, पेट्रोलियम स्थायी समिती
- सदस्य, सल्लागार समिती, गृह मंत्रालय
- १९९९: १३व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आल्या
- सदस्य, पेट्रोलियम आणि रसायने समिती
२००१-०४ पर्यंत, त्या राजस्थान प्रांतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा होत्या. व नंतर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाच्या अध्यक्षा होत्या.
फेब्रुवारी २००५ मध्ये, काँग्रेस पक्षाने मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारवर वर्चस्व गाजवले, व त्यांना पाचव्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नामित केले. या पदावर त्या ऑगस्ट २०११ पर्यंत होती. २००८ मध्ये त्या राजस्थानमध्ये आमदार म्हणूनही निवडून आल्या होत्या. २०१३ मध्ये त्या गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मूलन मंत्री होत्या.[४]
संदर्भ
- ^ "Rang-E-Ehsas".
- ^ "Girija Vyas: Poet and champion of women's rights".
- ^ "Girija Vyas Biography, Girija Vyas Bio". 5 October 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2011 रोजी पाहिले.
- ^ "Girija Vyas Takes Charge As Minister For Housing And Urban Poverty Alleviation".