Jump to content

गिटार

गिटार वाद्याचे विविध भाग

गिटार हे तारा छेडून वाजवायचे एक तंतुवाद्य आहे. गिटारास मुख्य अंग म्हणून एक पोकळ खोके, त्याला जोडलेली एक लांब मान व मानेवर लावलेल्या सहा किंवा अधिक तारा असतात. गिटारांची मुख्यांगे असलेली खोकी नाना प्रकारांच्या लाकडापासून बनवली जातात. गिटाराच्या तारा पूर्वी प्राण्यांची आतड्यांपासून बनवत असत; मात्र आता नायलॉन किंवा पोलादी तारा वापरल्या जातात. गिटारांचे दोन प्रमुख प्रकार असतात : अकूस्टिकइलेक्ट्रिक. by Ashish Dilip Landge

ब्राझिलियन लोकांचा संगीताचे संगीत वादन करणारा माणूस

हे वाद्य बोटांनी तारा छेडून वाजविले जाते. स्पेनमध्ये या वाद्याचा उत्कर्ष झाला. १८३० च्या सुमारास याचा भरपूर प्रसार झाला होता. शास्त्रीय संगीतासाठी गिटारचा यशस्वी वापर करण्याचे श्रेय फ्रॅन्सिस्को सोर आणि तरेगा यांच्याकडे जाते.

विसाव्या शतकात सेगोविआ या कलावंताने या वाद्याचा प्रवेश संगीताच्या सभागृहात करून दिला व संगीतरचनाकारही या वाद्यासाठी रचना करू लागल्याने या वाद्याचे पुनरुज्जीवन झाले. ज्यूलिअन ब्रीम, जॉन विल्यम्स, कार्लोस माँतोया, ख्रिस्तोफर पार्केनिंग यांच्यामुळे आज या वाद्याचा दर्जा वाढला आहे. जॅझ संगीतात निपुण गिटारवादक म्हणून चार्ली ख्रिश्चन, जांगो राईनहार्ट, चार्ली बर्ड, वेस मंगमरी इत्यादींचा उल्लेख करता येईल.

बाह्य दुवे

विदागारातील आवृत्ती